शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात नियोजनाअभावी कोरोनावरील ड्रायरन चाचणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनावरील लसीचे ड्रायरन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. मात्र, आयुक्तांसह ...

ठळक मुद्दे आयुक्तांसह अनेक अधिकारी चाचणीपासून अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनावरील लसीचे ड्रायरन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. मात्र, आयुक्तांसह महापालिका प्रशासनातील मोठया अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे ड्रायरन चाचणीला तूर्तास ब्रेक लावण्याची नामूष्की महापालिकेवर ओढवली आहे.गेल्या आठ महिन्यांपासून ठाणे शहरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच कोरोनावर लस कधी येणार याची रु ग्णांसह नागरिकांमध्येही आहे. त्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही करोना लसींच्या मर्यादित वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी नुकतीच परवानगी दिली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत ड्रायरन चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून शहरातील पोखरण पोखरण रस्ता 2 येथील आंबेडकर भवनसह पाच ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरीचे नियोजन केले होते. कोपरीतील प्रसृतीगृह, कासारवडवली येथील रोझा गार्डन आरोग्य केंद्र , मुंब्रा प्रेक्षागृह आणि मुंब्य्रातील महापालिका शाळा क्र मांक ७८ याठिकाणी या सराव फेरी होणार होत्या. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी या सराव फेरीचे परस्पर नियोजन केले होते. तसेच फलकही संबंधित केंद्रांवर लावले होते. परंतु, या ड्रायरन चाचणी संदर्भात ठाणे महानगर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोणतीच कल्पना दिलेली नव्हती. त्यांच्या संमतीविनाच या चाचणीचे नियोजन केल्याचे समोर आले आहे. या फेरीसाठी राज्य शासनाकडूनही कोणतेच आदेश आलेले नाहीत. यामुळेच आरोग्य विभागाला ही मोहीम बासनात गुंडाळावी लागली आहे.दरम्यान, आयुक्तांची परवानगी मिळाली नसल्यामुळे मंगळवारपासून करोना लसीकरण सराव फेरी सुरु होऊ शकलेली नसल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी दावा केला. ही मोहिम सुरु करण्याबाबत आयुक्तांसोबत चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले. 

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, राज्य शासनाकडून सराव फेरी घेण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी सराव फेरीची तारीख अद्याप निश्चित केली नाही.संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका* दरम्यान, पोखरण रोड क्रमांक दोन येथील डॉ. आंबेडकर भवन येथे मंगळवारी नियोजित केलेल्या संभाव्य लसीकरण केंद्रावर नोंदणी केंद्र, प्रतिक्षा कक्ष, लसीकरण केंद्र आणि लसीकरणानंतर रुग्णाचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण केंद्र अशा चार विभागात तयारी केल्याचे आढळले. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. दिवसाला किमान ९० ते १०० आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात लस दिली जाणार असल्याची माहिती या केंद्राचे समन्वयक राजेश कोळी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCorona vaccineकोरोनाची लस