शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाककृतींचे पुस्तक प्रथमच ब्रेल लिपीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:26 IST

दृष्टिहिनांसाठी ठरणार उपयुक्त : डोंबिवलीच्या ऐश्वर्या पुणेकर यांचा उपक्रम

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली : बाजारात अनेक पाककलेची पुस्तके उपलब्ध आहेत; मात्र दृष्टिहीन व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारे ब्रेल लिपीतील पुस्तक अद्याप उपलब्ध नव्हते. डोंबिवलीतील पाककलातज्ज्ञ ऐश्वर्या पुणेकर यांनी ‘रुचीपालट’ हे ब्रेल लिपीतील पहिले पाककलेचे पुस्तक आणल्याने अंध व्यक्तींनाही आता नवनवीन पदार्थ शिकता येणार आहेत. या पुस्तकाचे त्या मोफत वाटप करत आहेत.

गोग्रासवाडी येथे राहणाऱ्या ऐश्वर्या नऊ वर्षांपासून मुलींना पाककलेचे धडे देत आहेत. ‘रुचीपालट’ या पुस्तकाचे बे्रलमुद्रक एनएफबीएम ब्रेल पब्लिकेशन सेंटर यांच्यातर्फे जागृती या मुलींच्या शाळेत प्रकाशन झाले. आळंदी येथे या पुस्तकाचे प्रिंटिंग झाले असून ऐश्वर्या यांनी स्वखर्चाने हे पुस्तक काढले आहे. त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला ठाण्याच्या ‘नॅब’ संस्थेच्या सुखदा पंत आल्या होत्या. त्यांच्याकडून याची प्रेरणा ऐश्वर्या यांना मिळाली. पुस्तकामध्ये ७० रेसिपींचा समावेश आहे. यामध्ये सूप, चायनीज, पंजाबी पदार्थ, भाताचे विविध प्रकार, डोसा, पराठे, सॅण्डविच, ढोकळ्याचे प्रकार, उपवासाचे पदार्थ, कुकीज, स्टार्टर, केक , आइस्क्रीम, डेझर्ट, मॉक्टेल अशा विविध प्रकारचा समावेश आहे. हे पुस्तक तयार करण्यासाठी पाच ते सहा महिने लागल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले.

ऐश्वर्या यांनी प्रथम सर्व रेसिपी मराठीत लिहिल्या. त्या ‘प्रज्ञा चिकाक्षू’या सॉफ्टवेअरमध्ये टाक ल्या. त्यानंतर, हे पुस्तक तयार झाले. मराठीत एखादा शब्द चार अंकी असेल, तर ब्रेलमध्ये तो आठ अंकी होतो. त्यामुळे हे टाइप करायला जास्त कालावधी लागला. या पुस्तकाच्या सध्या ५० प्रती काढल्या आहेत. त्यातील सहा प्रती अंध मुलींना दिल्या.अंधांच्या संस्थेला पुस्तक दिले भेटडोंबिवलीतील ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर फाउंडेशनचे अनिल दिवटे यांना ऐश्वर्या यांनी पुस्तकाचा संच शुक्रवारी भेट दिला. दिवटे हे जन्मापासून दृष्टिहीन असून ३० वर्षे ते अंधांसाठी काम करत आहेत. दिवटे यांनी पुस्तकाची चार पाने वाचून आनंद व्यक्त केला. यावेळी मीना गोडखिंडी, अद्वैत पुणेकर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. ऐश्वर्या यांनी अंधांसाठी डोळस असे कार्य केले असून सर्व प्रकारच्या पाककृतींचा समावेश असलेले दुसरे पुस्तक काढण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे.