शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेसह दोघींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:00 IST

पैशाचे अमिष दाखवून जाळयात ओढल्यानंतर गरजू महिलांना शरीरविक्रयासाठी लावणाºया प्रिया जाधवा या दलाल महिलेसह तिला घर भाडयाने देणा-या रेखा अरोरा अशा दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे.

ठळक मुद्देपैशाचे अमिष दाखवून ओढले जाळयातठाणे गुन्हे शाखेच्या एएचटीसीची कारवाईदोन पिडीत महिलांची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणारी दलाल प्रिया जाधव (१९) आणि त्यासाठी घर भाडयाने देणारी रेखा अरोरा (६०) या दोघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून दोन पिडीत महिलांची सुटकाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रिया नामक महिला फोन केल्यानंतर तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात शरीरविक्रयासाठी महिलांना पाठविते, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कळव्यातील चिंचपाडा भागातील मातोश्री रमाबाई आंबेडकर बिंल्डींग पहिला मजला याठिकाणी ३१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडकर यांच्यासह जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, विजय पवार, लक्ष्मण भोईर, अक्षदा साळवी, निशा कारंडे, अंशिता मिसाळ आणि वर्षा माने आदींच्या पथकाने कळवा पोलिसांसह संयुक्तरित्या केलेल्या धाडसत्रात प्रिया आणि रेखा या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. दोन महिलांकडून पैशाच्या मोबदल्यामध्ये शरीरविक्रयाचा व्यवसाय करतांना त्या आढळल्या. महिलेची मागणी करणाºया ग्राहकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी रेखा हिच्या घरातील किचनचा वापर केला जात होता. कळवा पोलीस ठाण्यात या दोघींंविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींनाही बुधवारी रात्री ११.४० वा. च्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्या तावडीतून दोन पिडीत महिलांचीही सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इरशाद सय्यद हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा