शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातून पिस्तूल आणि गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:40 IST

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतांनाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने एकाला मुंब्य्रातून तर दुसऱ्याला झाँसी (उत्तरप्रदेश) येथून अटक करुन त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि एक गावठी कट्टा अशी सुमारे अडीच लाखांची शस्त्रसामुग्री जप्त केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईेउत्तरप्रदेशातील झाँसी येथून खरेदी प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

ठाणे : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणा-या रोहित भैय्यालाल गुप्ता (रा. मुंब्रा) आणि मुन्ना उर्फ मोहमद इक्राम शेख (रा. झॉसी, उत्तरप्रदेश) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल, एक गावठी कट्टा, मॅगझीन आणि काडतुस अशी शस्त्रास्त्रे हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.आगामी लोकसभा निवडणूक तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाºया गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने १९ जानेवारी रोजी रोहीत गुप्ता याला मुंब्रा परिसरातील साईसदन इमारतीच्या मैदानात, दिवा पश्चिम भागातून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केली. त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सखोल चौकशीमध्ये त्याने उत्तरप्रदेशातील झाँसी येथून हा गावठी कट्टा आणल्याची माहिती उघड झाली. याच माहितीच्या आधारे झाँसी येथून मुन्ना शेख यालाही या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन लाख दहा हजारांची दोन पिस्तूल आणि मॅगझिन अशी शस्त्रास्त्रे हस्तगत केल्याची माहिती देवराज यांनी दिली. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. मुन्ना शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला यापूर्वीही ठाणे रेल्वे पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक झाली होती, असेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्रा