शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

आज उधार; उद्या रोख

By admin | Updated: November 10, 2016 03:22 IST

आज रोख अन् उद्या उधार’ हा फलक अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळतो. उधारीवर खरेदीचा ‘उद्या’ हा कधीच उगवणार नसतो. मात्र, संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱ्या

ठाणे : ‘आज रोख अन् उद्या उधार’ हा फलक अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळतो. उधारीवर खरेदीचा ‘उद्या’ हा कधीच उगवणार नसतो. मात्र, संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या चलनी नोटा रद्द करून ‘आज उधार अन् उद्या रोख’, असा सुखद अनुभव ठाणेकरांच्या कुंडलीत लिहिला.नोटा रद्द झाल्यानंतर एटीएममध्ये खडखडाट होईपर्यंत ठाणेकरांनी पैसे काढले. त्यामुळे बुधवारी सकाळी ठाणेकर दूध, अंडी, ब्रेड असे जिन्नस घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी रद्द झालेली पाचशेची नोट शहाजोगपणे दुकानदारापुढे धरली. एरव्ही, बोहनीच्या वेळी पैसे विसरलो, असे सांगणाऱ्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकणाऱ्या दुकानदाराने हसतहसत ती पाचशेची नोट परत केली. सुटे असतील तर द्या, अन्यथा तुम्ही आपले नेहमीचे गिऱ्हाईक आहात. उद्या पैसे दिले तरी चालतील, असे सांगितले. मेडिकल दुकानांमध्ये रद्द नोटा चालवता येणार असल्याने ठाणेकरांनी तेथे एण्ट्री केली आणि किरकोळ जिन्नस खरेदी करून पाचशेची नोट पुढे केली. मेडिकल दुकानवाला म्हणाला की, साहेब माझ्याकडे सुटे नाहीत. एकतर, तुमची ही रक्कम जमा करून घेतो. जेव्हा यायचे तेव्हा येऊन औषधे किंवा लागेल ते खरेदी करा. अन्यथा, तुम्ही आपले नेहमीचे गिऱ्हाईक आहात. पैसे काय पळून जाणार आहेत. नंतर, द्या.ठाणेकरांनी मग भाजी-फळबाजार गाठला. तेथे दोन-तीन भाज्या किंवा दोन प्रकारचे फळफळावळ खरेदी करून पाचशेची नोट सुटी करण्याची चलाखी करून पाहिली, तर भाजीवाला म्हणाला की, साहेब मीच आज उधारीवर भाजी घेऊन आलोय. तुम्हीही तशीच घेऊन जा. उधारीची सवय नसल्याने लाजलेल्या काही ठाणेकरांनी भाजी तशीच खाली ठेवून काढता पाय घेतला, तर काहींनी पोटाला लागेल तेवढी भाजी उधारीवर नेली.