शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या तरण तलावांना आता दिले जाणार बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:55 IST

ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना यापुढे बोअरवेलचे पाणी देण्याचा विचार पाणी पुरवठा विभागाने सुरु केला आहे. त्यानुसार या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देसध्या दिले जातेय सहा लाख लीटर पाणीआरओ प्लान्टही उभारला जाणार

ठाणे - ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची गंभीर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली होती. त्यानंतर सर्व पक्षीयांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केल्यानंतर आता पाणी पुरवठा विभागाने या तरण तलावांना बोअरवेलचे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच या ठिकाणी आरओ प्लान्टसुध्दा विकसित केला जाणार असून बोअरवेलचे पाणी तरण तलावाबरोबरच पिण्यासाठी देण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.             मागील आठवड्यात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी शहरातील महापालिकेच्या स्विमींग पुलांना कोणते पाणी वापरले जाते असा सवाल उपस्थित केला होता. त्यानुसार या तरण तलावांसाठी पिण्याचे पाणी दिले जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी दिली. या तरण तलावांसाठी रोज प्रत्येकी दिड लाख लीटर पाणी दिले जात असून चार तरण तलावांसाठी सहा लाख लीटर पाणी पुरविले जात आहे. एकीकडे शहरात सध्या पाणी कपातीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. आजच्या घडीला २२ टक्के पाणी कपात लागू आहे. त्यात काही वेळेस उंच ठिकाणावरील भागांना पाणी दोन दोन दिवसांच्या फरकाने येत आहे. असे असतांना तरण तलावांना पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याने यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.परंतु याची दखल आता पाणी पुरवठा विभागाने घेतली असून या तरण तलावांच्या ठिकाणी बोअरवेल विकसित करता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यानंतर प्रत्येक तरण तलावाच्या ठिकाणी खाजगी तरण तलावाप्रमाणेच बोअरवेल विकसित केली जाणार असून त्याचे पाणी यासाठी वापरले जाणार आहे. तसेच या ठिकाणी आरओ प्लान्टसुध्दा विकसित केला जाणार असून या बोअरवेलच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पिण्यायोग्य केले जाणार आहे. त्यानुसार याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम आता हाती घेण्यात आले असून, येत्या काही दिवसात हा अहवाल तयार होऊन तो मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी