शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 07:04 IST

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली.

ठाणे : लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, बालसाहित्य, आत्मचरित्र, अनुवाद, वैचारिक लेखन, मुखपृष्ठ, चित्रपटविषयक लेखन आदी विविध साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्टॉल्स सभागृहाबाहेर लावण्यात आले होते. या पुस्तकांच्या लेखकांची स्वाक्षरी आणि सेल्फी यासह पुस्तक खरेदी करण्याची संधी उपस्थित रसिकांनी साधली. यामुळे प्रकाशकांच्या स्टॉलवर ठेवलेली सगळी पुस्तके अवघ्या चार तासांत विकली गेली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही न येणारा हा आगळावेगळा अनुभव यावेळी साहित्यिक, प्रकाशक आणि रसिकांनीही घेतला.   लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली. पुरस्कारविजेत्या साहित्यिकांच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे स्टॉल गडकरी रंगायतनच्या आवारात लावण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याला आलेले रसिक व वाचक या स्टॉलवर रेंगाळत होते. पुस्तके  पाहत होते. लागलीच खरेदी करीत होते. लेखक व वाचक यांच्या भेटीचा योग लोकमतने उपलब्ध करून दिला होता. पुरस्कार सोहळा संपल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यासह नीरजा, दासू वैद्य आदींसह इतर साहित्यिकांनी त्यांची पुस्तके विक्रीकरिता ठेवलेल्या स्टॉलवर हजेरी लावली. पुस्तक खरेदी करणाऱ्यांच्या पुस्तकावर स्वाक्षऱ्या केल्या. वाचकांनी पुस्तकावर स्वाक्षऱ्या घेताना किंवा घेतल्यानंतर लेखकांसोबत मोबाइलमध्ये फोटो काढून घेतले. 

दिग्गज प्रकाशक प्रथमच एका मंचावर 

या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज प्रकाशक प्रथमच एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक रामदास भटकळ, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक सदस्य दिनकर गांगल आणि मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे हे यावेळी उपस्थित होते. या प्रत्येकानेच आपापल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून गेली तीन-चार दशके उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. हे सर्व जण एकाच वेळी एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला. 

टॅग्स :Lokmatलोकमतthaneठाणे