शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

'ओएलएक्स'वर पुस्तकं विकणं पडलं महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:11 IST

‘गुगल पे’द्वारे ७९ हजार ९८० रुपयांची फसवणूक

कल्याण : ‘ओएलएक्स’द्वारे पुस्तके विकणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. भारतीय सैन्यात असल्याची बतावणी करत पुस्तके खरेदी करण्याचे सांगत एका भामट्याने ‘गुगल पे’द्वारे ७९ हजार ९८० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली.दुधनाका परिसरात राहणारे संजय प्रभू (५५) यांचा मुलगा सूरज याने दोन महिन्यांपूर्वी ‘ओएलएक्स’वर काही जुन्या वस्तू विकण्यासंदर्भात माहिती पोस्ट केली होती. २५ डिसेंबरच्या दुपारी पवनकुमारने सूरजला फोन करून पुस्तके विकत घ्यायची असल्याचे सांगितले. त्यावर पुस्तके २०० रुपयांना विकणार असल्याचे त्याने पवनकुमारला सांगितल्यानंतर त्याने त्यास होकार दर्शविला. आपण भारतीय सैन्यात कामाला असून, सध्या ठाण्यात राहात असल्याचे पवनकुमारने सूरजला सांगितले. प्रति पुस्तक २२० रुपयांना खरेदी केले जाईल. तसेच माझा मुलगा घरी येऊन ही पुस्तके घेऊन जाईल, असेही त्याने सांगितले. त्यानंतर, पवनकुमारने सूरजकडे ‘गुगल पे’चे खाते आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा माझ्या वडिलांकडे ‘गुगल पे’ असल्याचे सूरजने सांगत त्यांचा नंबर पवनकुमारला दिला.पवनकुमारने पैसे पाठवल्याचे सांगत क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार सूरजने क्युआर कोड स्कॅन केला असता पुढे जाण्याचा पर्यायावर क्लिक करण्यास पवनकुमारने सांगितले. त्यानंतर प्रभू यांच्या बँक खात्यातून २२० रुपये आणि १९ हजार ९९५ रुपये वजा झाले. सूरजने पवनकुमारला विचारले असता, यूपीआयचा पीन प्रविष्ट केल्यावर पैसे मिळतील, असे सांगितले. त्याच्या म्हण्यानुसार सूरजने केले असता पुन्हा १९ हजार ९९५ रुपये वजा झाले. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या सूरजने आपले पैसे परत मिळतील या अपेक्षेने पवनकुमार सांगत असलेली कृती करत राहिला. असे केल्याने प्रभू यांच्या बँक खात्यातून एकूण ७९ हजार ९८० रुपये काढून घेतल्याचे सूरजच्या निदर्शनास आले. याप्रकरणी प्रभू यांनी रविवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली.