शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोचचे बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:20 IST

प्रवाशांनी नदी, खोरे, धबधबे इत्यादी दृश्यांचा आनंद लुटला

डोंबिवली: एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी शनिवारी सुरू झाली.  विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व ४४ सीटस बुक होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली. या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला.  

रेल्वेमंत्री पीयूष गोयल जी यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, “मुंबई-पुणे मार्गावर, विषेश डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढत आहे. यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आपले सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे.उमेश मिश्रा जे त्यांच्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करीत होते त्यांनी फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या  व्हिस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल  रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार मानले. मोठ्या खिडक्या आणि बदलानुकारी/हलु शकणा-या आसनांमुळे त्यांच्या मुलास या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेता आला.

दुसर्‍या प्रवाशाने सांगितले की, तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा नियमित प्रवासी असून व्हिस्टाडोम कोच जोडल्याने भोर घाटातील प्रवास अधिक आनंददायक होईल. प्रथमच व्हिस्टाडोममध्ये प्रवास करणार्‍या सायली म्हणाली की त्यांनी मोठ्या खिडकीच्या पॅनेलमधून या दृश्यांचा आनंद लुटला आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल त्यांनी  भारतीय रेल्वेचे आभार मानले. ठरलेल्या वेळेत ही रेल्वेगाडी पुण्यात पोहोचली.  

प्रवासी माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि  दक्षिण पश्चिम घाटावरील  धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतील असा विश्वास रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला.