शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील खालिंग येथे आढळली बॉम्बसदृश वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:44 IST

खालिंग बुद्रुक येथील शांताराम पितांबरे यांना पहाटे चार वाजता घराच्या पायरीवर एक बॅटरी संच आढळून आला

भिवंडी : तालुक्यातील पडघानजीकच्या खालिंग बुद्रुक गावात एका घराच्या पायरीवर पहाटे बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने गावात घबराट पसरली होती. बॉम्बशोधक पथकाने तातडीने धाव घेत, ती वस्तू ‘बॅटरी सोर्स’ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, ग्रामस्थांसह पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खालिंग बुद्रुक येथील शांताराम पितांबरे यांना पहाटे चार वाजता घराच्या पायरीवर एक बॅटरी संच आढळून आला. ती बॉम्बसदृश दिसत असल्याने त्यांनी पंचायत समिती सदस्य गुरु नाथ जाधव यांना माहिती दिली. त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे हे फौजफाटा घेऊन खालिंग गावात दाखल झाले. त्यांनी या संशयास्पद वस्तूबाबत खातरजमा करण्यासाठी ठाणे बॉम्बशोधक पथकास पाचारण करून घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले हेसुध्दा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी संशयास्पद वस्तू जवळच्या शेतात नेवून तिची पाहणी केली असता, ती बॅटरी सोर्स असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी या गावात कुरियरद्वारे बाटली बॉम्ब पाठवला असता, त्यामध्ये एक महिला जखमी झाली होती. त्यामुळे या घटनेने पितांबरे यांच्या घराजवळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ती वस्तू बॉम्ब नसल्याचे समजल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.उद्देश तपासणारच्ही बॉम्बसदृश वस्तू कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेBombsस्फोटके