शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

बोगस कॉल सेंटर प्रकरण : आरोपींनी बनविले बँकेचे बनावट धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 3:35 AM

ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींनी चक्क अमेरिकन बँकेचे बनावट धनादेश तयार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

राजू ओढे ठाणे : ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींनी चक्क अमेरिकन बँकेचे बनावट धनादेश तयार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या आरोपींचे अमेरिकेत काही साथीदार असून, तेदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील आनंदनगरातील उन्नती वूड्स सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर कासारवडवली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकली. गुजरातमधील बडोदा येथील राकेश अनिल कोंडवाणी आणि राजस्थानमधील बिलियावास येथील जोरावत शेरसिंग राजपूत यांना पोलिसांनी अटक केली. व्हीओआयपी कॉलद्वारे हे आरोपी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना कर्जाचे आमिष दाखवायचे. त्यानंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली त्यांची फसवणूक करायचे.अमेरिकन नागरिकांची फसवणूक करताना त्यांचा विश्वास बसावा, यासाठी आरोपी काही ठरलेल्या युक्त्या वापरायचे. कर्जमंजुरीसाठी खात्याची पडताळणी करायची असल्याचे सांगून ते अमेरिकन नागरिकाचा बँक खाते क्रमांक मिळवायचे. या खात्यामध्ये काही डॉलर्सचा धनादेश जमा करणार असल्याचे सांगून, अमेरिकन बँकेच्या बनावट धनादेशाची प्रत ते पीडित नागरिकास ई-मेलद्वारे पाठवायचे. या कामासाठी त्यांना अमेरिकेतील त्यांच्या साथीदार आरोपींकडून वेळोवेळी मदत होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी सुनावली आहे.आरोपींचे अहमदाबाद कनेक्शनआॅक्टोबर २०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी मीरा रोडवरील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर गुजरात पोलिसांनी अहमदाबादमध्ये कारवाई करून तेथे बोगस कॉल सेंटर चालवणाºयांना अटक केली. या कारवाईमुळे बंद पडलेल्या बोगस कॉल सेंटरमधील आरोपींनी आता वेगवेगळ्या शहरांत हा गोरखधंदा सुरू केला. कासारवडवली पोलिसांनी अटक केलेला राकेश अनिल कोंडवाणी हा गुजरातचा रहिवासी असून तो यापूर्वी अहमदाबाद येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता, असे तपासात समोर आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा