शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जच्या गुन्ह्यात बोगस जामीन, वकिलासह तिघांना अटक; ठाणे न्यायालयीन वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 08:43 IST

एकच जामीनदार मुंबई, नवी मुंबईतही हजर केल्याचा आराेप

जितेंद्र कालेकरठाणे : पाच वर्षांपूर्वीच्या मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपीला बोगस जामीन प्रकरणात वकील आनंदप्रसाद सच्चिद्रनाथ उथ्थल  (४४, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यामध्ये बोगस जामीन देणारा दलाल दीपक चौबे (२७, रा. मीरा रोड, ठाणे) आणि जामीनदार अनिल राजाराम कुरणे (३९, रा. मीरा रोड, ठाणे) यांनाही अटक केली. बनावट जामीनदार प्रकरणात एका वकिलास अटक झाल्याने ठाणे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

ठाणेनगर पोलिसांनी चारच दिवसांपूर्वी ठाणे न्यायालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीनदार देणाऱ्या एका दलालासह पाच जणांच्या टोळीला अटक केली. अशाच प्रकारच्या अन्य एका प्रकरणातही ठाणेनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. महाराष्ट्र  दहशतवाद विरोधी पथकाच्या ठाणे युनिटने २०१९ मध्ये मीराज शेख ऊर्फ साबूल विश्वास या ड्रग्ज तस्कराला पकडले होते तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत असल्याने मीराज याने  २६ मार्च २०२४ रोजी जामिनासाठी अर्ज केला. 

पडताळणीदरम्यान पाेलखाेलमुंबई उच्च न्यायालयात एक लाखाच्या वैयक्तिक जामिनावर त्याची सुटका होणार होती. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी ठाणे न्यायालयात झाली. त्यात त्याने अनिल कुरणे आणि एक महिला अशा दोघांना जामीनदार म्हणून उभे केले होते. कुरणेसह दोघांनाही दीपक चौबे या दलालाने आणले होते. त्यावेळी ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी त्याच्या कागदपत्रांची पडताळणीचे आदेश ठाणे एटीएसला दिले. परंतु, दोघांचीही कागदपत्रे बनावट असल्याने ठाणे एटीएसने ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार कुरणेला ११ मे २०२४ रोजी तर यातील दलाल चौबेला १६ मे रोजी अटक झाली.

असा झाला व्यवहारया संपूर्ण तपासात कुरणेच्या कागदपत्रांची पडताळणी आनंदप्रसाद  उथ्थल या वकिलाने केल्याची बाब उघड झाली. शिवाय, ॲड. उथ्थल यांनीच कुरणे याला मुंबई आणि नवी मुंबईतही जामीनदार म्हणून हजर केल्याचे यातील दलाल चाैबे याला  १५ हजार रुपये तर कुरणेला दोन हजार  रुपये दिल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक सपना केचे यांच्या पथकाने ॲड. उथ्थल याला २ जुलै २०२४ रोजी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बुधवारी दिले. त्यानंतर तो जामिनावर सुटला. वकिलावर गुन्हा दाखल न हाेण्यासाठी पाेलिसांवर काही वकिलांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दबावाला न जुमानता वकिलास अटक केली असून या प्रकरणातील महिलेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे