भिवंडी : तीन दिवसांपुर्वी घराबाहेर खेळताना हरविलेल्या मुलीचा मृतदेह हात तुटलेल्या अवस्थेत तीच्या घरापासून शंभर मिटरच्या अंतरावर सापडला.तीचा मृतदेह दोन हात तुटलेल्या अवस्थेत सापडल्याने नरबळीचा प्रकार असावा की आपसांतील वैर या दृष्टीने देखील पोलिस शोध घेत आहेत.मात्र या घटनेने शहरातील रोशनबाग परिसरांतील पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.पायल महादेव प्रसाद (४)असे मृत मुलीचे नांव असून ती रोशनबाग येथील टावरे कंपाऊण्ड जवळील गौतम चाळीत आपल्या आईवडीलांसह रहात होती. पायलचे वडील महादेव प्रसाद यांचे चाळीनजीक पानाचे दुकान आहे.असे असताना रविवार १ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पायल घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. तीचा शोध घेऊनही ती न मिळाल्याने तीचे वडील महादेव प्रसाद सरजूप्रसाद यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात सोमवार दि.२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीसांनी तपास सुरू केला असता टावरे कंपाऊण्डलगत असलेल्या झुडूपात लहान मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी महादेव प्रसादकडून तो मृतदेह पायलचा असल्याची खात्री करून घेतली. सदरचा सडलेला मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेऊन जे.जे.हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोस्टमार्टम नंतर डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनुसार पायलचा मृतदेहास ६० तास उलटून गेल्याने तीचा मृतदेह सडलेला आहे. तसेच तीच्या डोक्याच्या मध्यभागी जड वस्तूने प्रहार केला असुन तीचे दोन हात दंडापासून कापले आहेत. मात्र तीच्यावर अत्याचार झाला किंवा नाही,या बाबत सडलेल्या मृतदेहामुळे निष्पन्न होऊ शकले नाही,अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उप निरिक्षक राजेंद्र मायन यांनी दिली. या निर्घुण हत्येच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाने पोलीसांचे पथक आरोपीचा कसोशीने शोध घेत आहेत.मात्र आरोपी याच भागातील असावा,असा कयास मांडला जात आहे.या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीत हरविलेल्या चार वर्षाच्या मुलीचा मृतदेह हात तुटलेल्या अवस्थेत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:40 IST
भिवंडी : तीन दिवसांपुर्वी घराबाहेर खेळताना हरविलेल्या मुलीचा मृतदेह हात तुटलेल्या अवस्थेत तीच्या घरापासून शंभर मिटरच्या अंतरावर सापडला.तीचा मृतदेह दोन हात तुटलेल्या अवस्थेत सापडल्याने नरबळीचा प्रकार असावा की आपसांतील वैर या दृष्टीने देखील पोलिस शोध घेत आहेत.मात्र या घटनेने शहरातील रोशनबाग परिसरांतील पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.पायल महादेव प्रसाद (४)असे ...
भिवंडीत हरविलेल्या चार वर्षाच्या मुलीचा मृतदेह हात तुटलेल्या अवस्थेत सापडला
ठळक मुद्देहरविलेल्या मुलीचा मृतदेह घरापासून शंभर मिटर अंतरावरहात तुटलेल्या अवस्थेत सापडला सडलेला मृतदेहजे.जे.हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे पोस्ट मार्टम