शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बॉबी खून प्रकरण : आरोपींना अलाहाबादमध्ये पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:31 IST

लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून  करणार्‍या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही  ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर  प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्झिस्ट कस्टडी घेऊन  ितघांनाही सोमवारी ठाण्यात आणले जाणार आहे.

ठळक मुद्देसोमवारी ठाण्यात घेऊन येणार

जितेंद्र कालेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून  करणार्‍या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही  ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर  प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्झिस्ट कस्टडी घेऊन  ितघांनाही सोमवारी ठाण्यात आणले जाणार आहे.या खुनातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सावरकरनगर  येथील रहिवाशांनी लोकमान्यनगर टीएमटी बस डेपो येथून शनिवारी मोर्चा  काढून निषेध व्यक्त केला. तत्पूर्वी, या प्रकरणाच्या तपासासाठी वर्तकनगर  पोलीस ठाण्याचे दोन, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे  एक अशा तीन पथकांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तिघेही  उत्तर प्रदेशात पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्यांना ११ नोव्हेंबर रोजी  अलाहाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना रविवारी  अलाहाबाद न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याना ठाण्यात  आणण्याची परवानगी ठाणे पोलिसांनी घेतली.

नावातील गोंधळामुळे खून..तरसेम सिंग उर्फ बॉबी याच्या मैत्रिणीला शिवमने सांगितले की, तू बाबूबरोबर  फिरत जाऊ नकोस. तिने बाबूऐवजी बॉबी ऐकले. शिवमने आपल्याला  तुझ्याबरोबर फिरू नकोस, असे सांगितल्याचे तिने बॉबीला सांगितले. याचा  जाब विचारण्यासाठी बॉबीने शिवमला बरेच कॉल केले. अनेक मिसकॉल पाहिल्यानंतर शिवमने त्याला फोन केला. तेव्हा शिवमने  त्याला सांगितले, मी बॉबी नाही तर बाबू म्हणालो. हवे तर मी तुला प्रत्यक्ष  भेटून हे सांगतो. त्यानुसार, ते भेटले. शिवम काही मित्रांसह तसेच हत्यार  बरोबर घेऊनच गेला होता. तेथे त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर शिवमने  थेट बॉबी आणि त्याचा साथीदार अजय सिंग याच्यावर छोट्या तलवारीने  पोटावर वार केला. यात बॉबीचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक