शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आपदा मित्रांना तलावात ‘बोट’ चालवण्याचे धडे, पूरस्थितीपूर्व प्रशिक्षण

By सुरेश लोखंडे | Updated: December 29, 2022 16:39 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकठिकाणच्या आपत्तीवर मात करण्यासाठी या आपदा मित्रांना विविध संकट कालावधीचे धड दिले जात आहे

ठाणे : जिल्ह्यातील नद्या, खाडी किनारे पावसाळ्यात आक्राळ विक्राळ रूप घेऊन वाहत असतात. या कालावधीत निर्माण होणाऱ्या जीवघेण्या पूर स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आता आपदा मित्रांचे दोन पथक तयार केले आहेत. त्यातील तरूणांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय आज येथील तलावपालीच्या तलावात त्यांना बोट चालवण्याचे, वल्हवण्याचे धडे आज तज्ञांकडून देण्यात आले आहेत. दोन सत्रात या तुक्यांना बोट चालवून आपत्तीवर मात करण्याचे धडे प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकठिकाणच्या आपत्तीवर मात करण्यासाठी या आपदा मित्रांना विविध संकट कालावधीचे धड दिले जात आहे. प्रशिक्षित होत असलेल्या या दोन्ही तुकड्यांमध्ये ११२ जणांचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येक तुकडीत ५६ जणांचा समावेश आहे. त्यांना येथील तलावपालीच्या तलावात पूर स्थितीत बोट चालवण्याचे धडे देण्यात आले. दोन सत्रात या प्रशिक्षणार्थींना या बोट चालवण्याचे धडे देण्यात आल्याचे या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी अनिता जवंजाळ यांनी लोकमतला सांगितले. विविध स्वरूपाचे धडे घेत असलेल्या या पहिल्या तुकडीत राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या आधी या आपदा मित्रांना ‘आगीवर नियंत्रण’ मिळवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही मिळाले आहे. जिल्ह्यातून ५०० आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपदा मित्र प्रात्यक्षिक, प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या तुकडीचे १२ दिवसांचे प्रशिक्षण ठाण्यातील व्ही.पीएम.केजी. जोशी कला महाविद्यालय आणि एन.जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयात सुरु आहेत. निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणासह प्रात्यक्षिकांचा उपक्रम हाती घेतला आहे. ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख ओमकार वैती, भिवंडी अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन चौहाण, कार्य अधिकारी नरेश भूवणे, सुहास पेडणेकर, ठाणे ग्रामीण पोलीसच्या महिला हवालदार भाग्यश्री सावंत आदी तज्ञ व अनुभविकांकडून या आपदा मित्रांना धडे मिळत आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोअर (एन.सी.सी) आर्मी गर्ल्स, एन.सी.सी नेव्हल युनिट, राष्ट्रीय सेवा योजना व आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यपन करणारे विद्यार्थी यांनी सहभागी आहेत. 

टॅग्स :thaneठाणेfloodपूर