शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी हॉस्पीटलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच पालिकेने केली ठाणेकरांची फसवणुक, पालिकेने केले दरपत्रक निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 14:38 IST

खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबविण्यासाठी मागील काही दिवसापासून ठाण्यात उहापोह सुरु होता. त्यानंतर आता गुरुवारी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बैठक घेऊन खाजगी रुग्णालयासंदर्भातील दर निश्चित केले आहेत. परंतु हे दरही सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचे दिसत आहे.

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णांलयांकडून सुरु असलेली लुट थांबवावी अशी मागणी ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार पालिकेने आता खाजगी रुग्णालयांसाठी दरपत्रक जाहीर केले आहे. मात्र हे दरपत्रक सर्वसामान्यांबरोबर मध्यमवर्गीयांनाही न परवडणारे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार सामान्य, शेअरींग, स्वतंत्र आणि अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दर निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे करोनाबाधित रु ग्णांना उपचारासाठी आता प्रतिदिन चार ते दहा हजार रु पये इतका खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला १४ ते १८ दिवस रुग्णालयात राहावे लागले तर त्याचे बील हे पूर्वीप्रमाणेच दिड ते दोन लाख किंबहुना त्यापेक्षा जास्तीचे भरावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेने एकप्रकारे ठाणेकरांच्या तोंडाला पानेच पुसण्याचा हा प्रकार केला आहे.                  ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरूवारी रु ग्णालय प्रतिनिधी, आयएमए संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यामध्ये खासगी कोवीड रु ग्णालयात उपचाराचे दरपत्रक निश्चिात केले. त्यानुसार जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी रु ग्णाकडून प्रतिदिन चार हजार रु पये आकारले जाणार आहे. त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. शेअरींग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रु पये आकरले जाणार आहेत. त्यात रु ग्ण खोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रु पये आकारले जाणार असून व्हेंटीलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रु पये आकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रु ग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा रु ग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एकूणच ठाणेकर किंवा सर्वसामान्य नागरीकांना,मध्यमवर्गीयांना पालिका दिलासा देईल असे वाटत होते. मात्र पालिकेने या सर्वांच्या तोडांला पाने पुसविण्याचा प्रकार केला आहे. दिलासा देण्याऐवजी खिशाला कात्री लावण्याचाच हा प्रकार असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आता या विरोधात आवज उठविणारे पालिकेच्या या भुमिकेबाबत काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या