शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीच्या हल्ल्याने तरुणाचा खून, टोळीचा पोलिसांना गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 21:10 IST

ठाणे : आपल्या मैत्रिणीला उलटसुलट माहिती का देतोस, याबाबतचा जाब विचारणा-या तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याच्यावर एका त्रिकुटाने तलवारीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

ठाणे : आपल्या मैत्रिणीला उलटसुलट माहिती का देतोस, याबाबतचा जाब विचारणा-या तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याच्यावर एका त्रिकुटाने तलवारीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यातील आरोपींच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागासह तीन पथकांची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.हा हल्ला शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद यांनी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेच्या समोरील रस्त्यावर तरसेम सिंग आणि त्याचा साथीदार अजय सिंग या दोघांवर तलवारीने हल्ला केला. यात तरसेम सिंगचा मृत्यू झाला तर अजय हा गंभीर जखमी झाला आहे. अजय आणि तरसेम सिंग या दोघांची एक मैत्रिण आहे. या दोघांच्याही ओळखीमुळेच शिवम आणि राहुल हेही तिला ओळखतात.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शिवम आणि राहुल हे अजय आणि तरसेम यांच्याविरुद्ध उलट सुलट सांगत होते. याबाबतची माहिती तिने आपल्या या मित्रांनाही दिली होती. त्यामुळेच तरसेम याने शिवमला याबाबतचा जाब विचारला. याच रागातून शिवमने तरसेम याला ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ज्ञानोदय शाळेजवळ भेटण्यासाठी बोलविले. त्याचवेळी शिवम, राहुल आणि आकाश या तिघांनी तरसेम याच्यावर तलवारीने पोटावर वार केले. याशिवाय, त्यांनी हनुवटीवर, उजव्या छातीच्या खाली, पाठीवर डाव्या छातीच्या खालीही चाकूने वार केले. या हल्ल्यात तरसेमचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर अजयवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याची दोन तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे एक अशा तीन पथकांची निर्मिती केली आहे. या तिघांनाही फोटो, व्हॉटस्अ‍ॅप गृपच्या सहाय्याने, खब-यांच्या मदतीने तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘‘तिवारीसह तिघांचीही ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती केली आहे. आरोपींचा माग घेण्यात येत असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल.’’सुनील लोखंडे, उपायुक्त, वागळे इस्टेट विभाग, ठाणे