शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 06:17 IST

कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : चिकाटी आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते. कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे दोनच वर्षांपूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. प्रथमेश हा बिर्ला कॉलेजच्या कला शाखेचा विद्यार्थी असून त्याच्या यशामुळे त्याच्या आईवडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.प्रथमेश हा जन्मत:च अंध आहे. त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरकडे तपासणी केली, तेव्हा तो अंध असल्याचे त्यांना समजले. प्रथमेशचे वडील धीरेंद्र हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. आई प्रतीक्षा ही गृहिणी आहे. त्याला एक बहीण आहे. तीही जन्मत:च अंध आहे. ती सहावीत शिकत आहे. परीक्षेच्या काळात त्याला तीन दिवस खूप त्रासही झाला होता. त्याला परीक्षेच्या काळात रिअ‍ॅक्शन होऊन अतिसाराचा त्रास झाला होता. या परिस्थितीतही त्याने जिद्द न सोडता परीक्षा दिली. त्याला मराठीत ७३, इंग्रजीत ७६, भूगोल ४७, इतिहास ५५, राज्यशास्त्र ४३, ग्रेड विषयात ५० पैकी ४२ गुण मिळाले आहेत. प्रथमेशला इतिहास विषय घेऊन पदवी संपादन करायची आहे. वीर सावरकर संस्थेची २६ मे ला शिवाजी पार्कला मॅरेथॉन स्पर्धा झाली होती. त्यात त्याला विशेष पारितोषिक मिळाले आहे. प्रथमेश सुरुवातीला पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत जात होता. तो अंध असल्याचे समजताच त्याच्या आईने ‘नॅब’चा एक कोर्स पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे संगोपन कसे करायचे हे तिला समजले. नॅबकडून एक शिक्षक येऊन त्याला शिकवत होते. त्याला ब्रेल लिपीतून अभ्यास करावा लागणार असला तरी तो डोळस मुलांच्या शाळेत शिकावा, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी प्रथमेशला सरस्वती मंदिर शाळेत घातले. लहान असताना स्नेहसंमेलनात तो सहभागी होत असे. नॅब ही दहावीपर्यंतचे अभ्यासक्रमाचे रेकार्डिंग देत असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी स्नेहांकितसंस्थेशी संपर्क साधला. या संस्थेने त्याला रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले. अंधत्वावर मात करीत शिक्षण घेत असताना प्रथमेशला आणखीन एक समस्या उद्भवली. त्याची मूत्रपिंड कमी प्रमाणात काम करीत असल्याचे वैद्यकीय तपास अहवालात उघड झाले. इयत्ता सातवी ते नववीपर्यंत प्रथमेशच्या मूत्रपिंडावर उपचार सुरू होते. नववीचे पूर्ण वर्ष तो डायलिसिसवर होता. ७६ तासांचे डायलिसिस घेऊन त्याला शाळेत हजर राहता येत नव्हते.>वडिलांनी दिले मूत्रपिंडमूत्रपिंड निकामी झाल्याने प्रथमेशच्या आईवडिलांसमोर मोठा पेच निर्माण झाला. वडिलांना आपल्या मुलाच्या वेदना सहन होत नव्हत्या. त्यांनी त्याला आपली किडनी दिली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाने प्रथमेशला एक प्रकारे जीवदान मिळाले. त्यानंतरही त्याचा त्रास सहन झाला नाही. त्यांना काही पथ्ये पाळावी लागतात. अन्न-पाणीसोबत ठेवावे लागते. त्याला रक्तदाब व मधुमेहाचाही त्रास आहे. एवढे सर्व सहन करून त्याने दहावीत ७५ टक्के गुण मिळविले होते.