शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामाला आशीर्वाद?, केडीएमसी आयुक्तांना दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:31 IST

पश्चिमेतील जयहिंद कॉलनीतील प्रभाग क्रमांक ५७ मधील बेकायदा बांधकामांबाबत काँग्रेसच्या नगरसेविका तसेच महिला बालकल्याण समिती

डोंबिवली : पश्चिमेतील जयहिंद कॉलनीतील प्रभाग क्रमांक ५७ मधील बेकायदा बांधकामांबाबत काँग्रेसच्या नगरसेविका तसेच महिला बालकल्याण समिती, शिक्षण मंडळ समिती सदस्या हर्षदा भोईर यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, महापालिकेने त्यावर कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या दिरंगाई आणि मनमानी कारभाराबद्दल माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.भोईर म्हणाले की, जयहिंद कॉलनी प्रभागात कॅप्टनवाडी येथे होत असलेल्या बेकायदा बांधकामांबद्दल २० एप्रिलला आयुक्तांना पत्र दिले. पण, कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच पत्रालाही उत्तर मिळाले नाही. बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी राज्य सरकारने ३ मे रोजी अध्यादेश काढला आहे, पण त्याची अंमलबजावणी जर होणार नसेल, तर उपयोग काय? नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे बेकायदा बांधकाम सुरू असल्याबद्दल दाद कोणाकडे मागायची, असा सवाल त्यांनी केला.प्रभागातील नागरिकांची पत्रेही आयुक्तांना दिलेल्या पत्रासोबत जोडली आहेत. पण, तरीही काही उपयोग झाला नाही. त्यासंदर्भात १७ एप्रिलला ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनाही पत्र दिले, पण त्यांनीही कानाडोळा केल्याचे भोईर म्हणाले. बेकायदा बांधकामांवर कारवाईत होत नसल्याने काम करणे कठीण होत असल्याचे हर्षदा भोईर म्हणाल्या. प्रभागक्षेत्र अधिकारी लक्ष देत नाहीत, त्यात आता आयुक्तही कानाडोळा करत असतील तर मात्र परिस्थिती गंभीर आहे, असे हृदयनाथ भोईर म्हणाले.