शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली पुन्हा एकदा हादरली, आर्च फार्मा कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 13:41 IST

डोंबिवली शहराच्या पूर्व भागात सागाव येथील आर्च फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये आज पहाटे दोन वाजता स्फोट झाला.

डोंबिवली - शहराच्या पूर्व भागात सागाव येथील आर्च फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये आज पहाटे दोन वाजता स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनी परिसरातील इमारतींना जबरदस्त  हादरा बसला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेमुळ प्रोबेस कंपनीच्या स्फोटाची आठवण नागरिकांना झाली. पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आहे. दोन वर्षात पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षिततेची काळजी कंपन्या घेत नसल्याची बाब या निमित्ताने प्रकर्षाने सामोर आली आहे.

औषधे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आर्च फार्मा कंपनीत तयार केला जातो. कच्च्या मालावर प्रक्रिया सुरु असताना रिअॅक्टरमध्ये पहाटे दोन वाजता स्फोट झाला. रिअॅक्टर क्लिनींग करण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी हवेचा दाब रिअॅक्टरमध्ये वाढला. त्यामुळे हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला त्याचा मोठा हादरा बसला. शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना वाटले की, त्यांच्या शेजारची इमारत पडली. तर काहींना भूकंप झाला असल्याचे वाटले. पहाटे दोन वाजता भयभीत झालेले नागरीक घराबाहेर आले तेव्हा शेजारच्या कंपनीत स्फोट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीच्या इमारतीचा सज्जा स्फोटामुळे कोसळून पडला आहे.

कंपनीतील सुरक्षा अधिकारी राजेश भगत यांनी कंपनीत स्फोट झाला असल्याचे मान्य केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. रिअॅक्टरचं क्लिनिंग सुरू असताना हवेचा दाब वाढल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनी परिसरातील इमारतीत राहणारे गजानन जाधव यांनी सांगितले की, स्फोटामुळे आसपासच्या परिसराला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे नागरी वस्तीतील लोक भयभीत झालेले आहेत.

जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. दोन वर्षानंतर पुन्हा आर्च फार्मा कंपनीत स्फोट झाला. सरकारने या घटनातून काही बोध घेतलेला नाही. प्रोबेसच्या चौकशी अहवालात धोकादायक कंपन्या विषयी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याही सरकारने स्विकारलेल्या नाहीत. सरकार नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहे.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोट