शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

टक्केवारीमुळे विकासकामे रखडल्याने भाजपचा ठिय्या; ठाणे जिल्ह्यातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:28 IST

प्रभागांतील कामे मंजूर करण्याची मागणी

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून गोषवारा सादर करण्यासाठी एक टक्का दिला जात नसल्याने विकासकामे रखडली असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. विकासकामे करण्याच्या मागणीसाठी भाजपने चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी महापालिका मुख्यालयात प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर सोमवारी ठिय्या धरला.

भाजपच्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल दामले, भाजप गटनेते शैलेश धात्रक, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक दया गायकवाड, संदीप गायकर, नितीन पाटील, राजन आभाळे, विश्वदीप पवार, अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका रेखा चौधरी, वैशाली पाटील, सुनीता पाटील, खुशबू चौधरी सहभागी झाले होते.

केडीएमसीतील नगरसवेकांची मुदत ११ नोव्हेंबरला संपत आहे. दुसरीकडे मनपाने अर्थसंकल्प मंजूर होऊनही त्याची पुस्तिका अद्याप तयार केलेली नाही. त्यामुळे नगरसेवकांची कामे रखडली आहेत. ही कामे मंजूर करावीत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.मनपा हद्दीतील नागरिकांसाठी अभय योजना जाहीर करण्यासंदर्भात सोमवारी दुपारी प्रशासकीय भवनात महापौरांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या त्यांच्या दालनाच्या दिशेने जात असताना त्यांनी ठिय्या देणाऱ्या नगरसेवकांची विचारपूसही केली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, चव्हाण यांनी टक्केवारीच्या केलेल्या आरोपाविषयी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, आमदारांसोबत झालेल्या बैठकीत टक्केवारीचा विषय मांडण्यात आला नव्हता. तरीही त्यांनी केलेल्या आरोपाविषयी एखाद्या तरी प्रकरणात पुरावा सादर केल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.‘निविदांमध्ये बड्या नेत्याचा हात’कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्प दीर्घकाळ रखडलेले आहेत. या प्रकल्पांच्या निविदांमध्ये ठाणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा हात आहे. त्यामुळेच हे प्रकल्प रखडले असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला आहे. मात्र, हे आरोप करताना त्यांनी कोणाचे थेट नाव घेतले नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपा