शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

नवघरमधील प्रस्तावित तरणतलावावर भाजपाची कोलांटउडी; विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर करण्यात आलेला नवघर येथील

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर करण्यात आलेला नवघर येथील प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली. याविरोधात सेना व काँग्रेस या विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाल्याने काही वेळेपुरता सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. 

पालिकेने माजी खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या क्रिडा संकुलात पहिले तरणतलाव साकारण्यात आले आहे. या तरणतलावाचे कंत्राट खाजगी संस्थेला दिल्याने संस्थेकडुन त्यासाठी सुमारे ५ हजार रुपये वार्षिक रक्कम जलतरणपटूंकडुन वसुल केली जाते. पालिकेच्या तरणतलावासाठी एवढी भरमसाठी रक्कम वसुल करणे आक्षेपार्ह असुन नाममात्र दर त्यासाठी निश्चित केला जावा, अशी मागणी भाजपाचेच मोरस रॉड्रीक्स यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे केली. मात्र या तरणतलावाला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव विकासकाच्या माध्यमातून साकारण्यात यावे, अशी मागणी सेना नगरसेवक दिनेश नलावडे व माजी नगरसेवक राजेश वेतोस्कर यांनी केली होती. त्यासाठी गटनेत्या निलम ढवण यांनी देखील आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या तलावाच्या विकासासाठी चालु अंदाजपत्रकात २ कोटींची तरतूदही केली. त्याच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. मात्र त्याला पुढील सभेत घेण्याचे स्पष्ट करीत भाजपाने त्यावर कोलांटउडी घेतली. हा तरणतलाव साकारला असता तर त्याचे श्रेय सेनेला जाण्याची भिती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्यानेच त्यांनी त्यावर चर्चा न करताच त्याला बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय विरोधकांनी घेतल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यांनी भाजपाच्या या मनसूब्याला तीव्र विरोध करीत नवघरच्या तलावाचा निधी इतरत्र वर्ग करण्याचा हा सत्ताधाय््राांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रस्तावित तरणतलाव नवघर येथील मोठ्या लोकवस्तीत साकारण्यात येणार असल्याने तो तेथील जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार होता. परंतु, सत्ताधाय््राांनी त्याला बगल देत विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला. दहिसर चेकनाका परिसरात लोढा अ‍ॅक्वा येथे प्रस्तावित तरणतलावाच्या विकासानंतरच नवघर येथील तलावाचा विकास करण्यासह भाजपाचा शहरात ६ तरणतलाव बांधण्याचा मानस असल्याचा दावा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी केला. त्यावर विरोधकांनी, या तरणतलावाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने नवघरच्या तलावाला विरोध का, असा प्रश्न सत्ताधाय््राांना केला. विरोधकांनी त्यावर गोंधळ घालताच महापौरांनी विरोधकांना ठराव मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सेनेचे दिनेश नलावडे यांनी तलाव साकारण्याचा तर सत्ताधारी भाजपाचे मोहन म्हात्रे यांनी त्याच्या विरोधात ठराव मांडला. त्यावर पार पडलेल्या मतदानात म्हात्रे यांचा ठराव बहुमताने मंजुर करण्यात आला. यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी देखील नवघरच्या तलावाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन पुढील सभेत त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी केली. पाटील यांच्या या विधानामुळे विरोधकांना हायसे वाटले असले तरी पाटील यांनी ठरावावेळी म्हात्रे यांच्या ठरावावर मतदान केल्याने त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली.