शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रेय लाटण्याची भाजपाला सवय, महापौरांची राज्यमंत्र्यांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:01 IST

सत्ता भाजपाची असल्यामुळे निर्णय घेण्याचे काम सरकार करते. इतरांनी त्या कामाचा पाठपुरावा केल्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याची सवय भाजपा नेत्यांना आहे.

कल्याण : सत्ता भाजपाची असल्यामुळे निर्णय घेण्याचे काम सरकार करते. इतरांनी त्या कामाचा पाठपुरावा केल्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याची सवय भाजपा नेत्यांना आहे. ही सवय त्यांना लखलाभ असो, अशी टीका महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेने कधीही दुसºयाच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प मंजूर केल्याबद्दल शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत, असे स्पष्ट केले आहे.जलवाहतुकीचा प्रकल्प आणि मेट्रो रेल्वेसाठी पाठपुरावा केल्याचे वक्तव्य डोंबिवलीत झालेल्या पत्रकारांच्या दिलखुलास कार्यक्रमात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. मात्र, देवळेकर यांनी त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. जलवाहतूक व मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करून प्रकल्प मंजूर करण्यास सरकारला भाग पाडले. त्यावर चव्हाण यांनी टीका करणे हे बालीशपणाचे लक्षण आहे. जलवाहतुकीसाठी गडकरी यांनी ५०० कोटी मंजूर केले. त्यावेळी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे उपाध्यक्ष असलेले चव्हाण कुठे होते, असा सवाल देवळेकर यांनी केला. जलवाहतुकीचा मार्ग कसा व कुठून जातो हे तरी चव्हाण यांना ठाऊक आहे का, असा केला. ठाणे, भिवंडी, कल्याण मेट्रो मंजूर केल्यानंतर कल्याण ते तळोजा, तळोजा ते शीळ, शीळ ते ठाणे, असा मेट्रोचा कर्टल जोडण्यासाठी खासदार व पालकमंत्री शिंदे प्रयत्नशील आहेत. डोंबिवलीही त्यात जोडून मेट्रोच्या मॅपवर आणण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. डोंबिवली मेट्रोला जोडून घेतली गेली नव्हती, तेव्हा भाजपाचे नेते काय करत होते?, असा सवाल देवळेकर यांनी केला.भाजपा-सेनेत जुंपली-महापौरांच्या या वक्तव्यामुळे भाजपा व शिवसेनेत विकास कामावरून चांगले जुंपले असल्याचे चित्र समोर आले आहे. यापूर्वी मेट्रो रेल्वेच्या मुद्यावरून भाजपा खासदार कपिल पाटील व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात जुंपली होती.तर अंबरनाथ येथील मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या विकास कामावर भाजपा आमदार किसन कथोरे व खासदार शिंदे यांच्यात जुंपली होती.आता पुन्हा खासदारांनी ही कामे मंजूर करून घेतली. त्याच मुद्यावरून चव्हाण आणि देवळेकर यांच्यात जुंपली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना