शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या विटांवरून भाजपतील वाद उफाळला; २११ पैकी उल्हासनगरातून केवळ दोनच विटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 00:26 IST

राममंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान असावे याकरिता देशातील सिंधी बांधवांनी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली निधी गोळा केला.

सदानंद नाईकउल्हासनगर : अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी सिंधी बांधवांनी एक किलो वजनाच्या २११ चांदीच्या विटा रामजन्मभूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोपविल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. दरम्यान, आयलानी यांनी उल्हासनगरमधून केवळ दोनच विटा दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. यामुळे नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. उर्वरित विटा या उभारण्यात आलेल्या निधीतून दिल्या असल्याचे रामचंदानी यांचे म्हणणे आहे. शहरात जर कार्यक्रम घेतला असता तर अधिक विटा, निधी मदत म्हणून गेला असता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत आयलानी यांच्याशी संपर्क साधला असता मी आता गडबडीत आहे, नंतर बोलतो, अशी प्रतिक्रिया दिली.

देशातील नव्हे तर जगातील सिंधी समाज उल्हासनगरकडे वेगळ्या नजरेने पाहतो. आयलानी यांच्या आततायी स्वभावामुळे शहरातील सिंधी समाजाचे नाव बदनाम झाले असाही त्यांनी आरोप केला आहे. आयलानी यांच्यासमवेत शिष्टमंडळात भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, राजेश वधारिया, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, देवीदास भारवानी, विक्की लासी यांच्यासह विश्व सिंधी समागमचे सुहिरा सिंधी, देशातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.

राममंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान असावे याकरिता देशातील सिंधी बांधवांनी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली निधी गोळा केला. या निधीतून एक किलोच्या २११ चांदीच्या विटा राय यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी सुपूर्द केल्या. तसेच मंदिर उभारणीसाठी सिंधी समाज कधी व केव्हाही पुढे असेल, अशी माहिती आयलानी यांनी दिली. शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्याचे रामलल्ला मंदिर व राममंदिर बनविणाऱ्या कार्यशाळेला, हनुमानगडी, शरयू नदी आदींचे दर्शन घेतले. शहरातील बहुतांश सिंधी समाज उद्योगशील असून, मुंबई, दिल्ली, पुणे आदी शहरात उधोगधंद्यासाठी गेला.

सिंधी समाजाकडून मोठी मदत जाणारदेशात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरमध्ये वास्तव्याला आहे. राममंदिर उभारण्यासाठी मोठी मदत देण्याकरिता भविष्यात मोठा कार्यक्रम घेण्याचे संकेत भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी दिले आहेत. जी मदत दिली यापेक्षाही शहरातून मोठी मदत देण्याचा प्रयत्न सिंधी बांधवांचा असेल, असेही रामचंदानी यांनी सांगितले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर