शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध भाजपची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:02 IST

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच भाजप गटनेते संजय वाघुले यांच्या पोलीस चौकशीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरु वारी सरनाईक यांनी केली. त्यापाठोपाठ सोमय्या यांनीही शुक्र वारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात अनधिकृत बांधकामासंदर्भात तकार अर्ज केला आहे.

ठळक मुद्दे *ओसी नसतांनाही विहंग गार्डनची घरे विकली हिम्मत असेल अब्रुनुकसानीचा दावा ठोकाभाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांचे प्रतिआव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: व्होल्टास कंपनी कोविड सेंटरवरील आरोपांना उत्तर देताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच भाजप गटनेते संजय वाघुले यांच्या पोलीस चौकशीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरु वारी सरनाईक यांनी केली. त्यापाठोपाठ सोमय्या यांनीही शुक्र वारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात तकार अर्ज केला आहे. तसेच सरनाईक यांनी केलेल्या १०० कोटींच्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडविली.सोमय्या यांच्यासह भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्र वारी शिवसेनेचे ठाण्यातील ओवळा-माजिवडयाचे आमदार सरनाईक यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दिला. या तक्रारीमध्ये सोमय्या यांनी म्हटले आहे की, वर्तकनगर येथील विहंग गार्डन सोसायटीमध्ये सरनाईक यांच्या विहंग हौसिंग ए१, ए२, ए३ आणि ए४ तसेच बी१ आणि बी२ या इमारतींचे बांधकाम केले आहे. २००७- २००८ मध्ये वापर परवानासाठी विकासकांनी, सरनाईक यांनी अर्ज केले. ए१ ते ए४ या इमारतींमध्ये काही त्रुटी होत्या. त्या सुधारल्यानंतर पुन्हा त्यांनी ओसीसाठी अर्ज केला. तेंव्हा ठाणे महापालिकेने २००८ मध्ये वापर परवाना दिला. मात्र, बी१ आणि बी२ या इमारतींसाठी तो दिलेला नाही. त्यात अनेक त्रुटी होत्या आणि अनधिकृत बांधकामही होते. त्यामुळे अगदी २०२० पर्यंत बी१ आणि बी२ या इमारतीला वापर परवानाच अर्थात ओसी मिळालेली नाही. त्यामुळेच २०१२ मध्ये ठाणे महापालिका आयुक्तांनी बी१ आणि बी२ या इमारतीचे ९ ते १३ मलले अनधिकृत असून ते तोडण्याचा निर्णय दिला. परंतू, अजूनही हे अनधिकृत बांधकाम जैसे थे तसेच आहे. सरनाईक आणि विकासकाने २००८ मध्ये बी१ इमारतीच्या सदनिका ग्राहकांना विकल्या आहेत. यामध्ये ९ ते १३ मजले अनधिकृत असूनही त्या विकल्या आहेत.ज्या मध्यमवर्गीयांनी या इमारतीमध्ये घरे खरेदी केली, त्यांची फसवणूक झाली आहे. महापालिकेचेही पैसे दिले नाही. अनधिकृत बांधकाम करुन टीडीआरचेही पैसे वाचविले. त्यामुळेच याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० आणि ४०६ प्रकरणी सरनाईक यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्याची मागणी त्यांनी केली आहे.* तब्बल १३ वर्ष विहंग गार्डन इमारतींना ओसी मिळाली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, सोमय्या यांच्याविरुद्ध सरनाईक केलेल्या १०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचीही खिल्ली उडवत सोमय्या म्हणाले, सरनाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकून दाखवावा.सरनाईक यांनी सामान्य जनतेची लूट केली असून मोठा भ्रष्टाचारही केल्याचा आरोप त्यांनी केला. या उलट सरनाईकांचा दावा म्हणजे ‘चोर मचाये शोर’ असल्याचेही सोमय्या म्हणाले.* यासंदर्भात सरनाईक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.‘‘ सोमय्या यांच्या तक्रार अर्जाची तथ्यता तपासून योग्य ती कायदेशीर पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी हा तक्रार अर्ज ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे.’’पंकज शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र