शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लाेकसभेवर भाजपचा दावा ठाम,संजीव नाईक, संजय केळकर यांची नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 12:50 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे.

ठाणे : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना ठाणेलोकसभा मतदारसंघावर भाजपने ठाम दावा केल्याची माहिती आहे. यापूर्वी कल्याण मतदारसंघावर भाजप दावा करेल, असे सांगितले जात असले, तरी कल्याणमध्ये विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे आहेत; परंतु ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवार नसल्यानेच भाजपने आपला दावा अधिक प्रबळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. भाजपने ठाण्यासह कल्याण लोकसभेवर दावा केला आहे. शिवसेना दोन गटांत विभागली गेल्याने त्याचा फायदा भाजप उठवू पाहत आहे. काही झाले तरी कल्याण मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो सोडण्याची तयारी शिवसेना (शिंदे गटाची) नाही. हा बालेकिल्ला आपल्याकडे राहावा, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.  मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पारडे जड असल्याने येथून भाजपच निवडणूक लढवणार, असा भाजपचा दावा आहे.

कल्याणच्या बदल्यात ठाणे; भाजपचा आग्रह ठाणे लोकसभेवर दावा करताना भाजपचा युक्तिवाद असा की, शिवसेना जरी ठाणे हा बालेकिल्ला असल्याचे सांगत असली, तरी ठाणे लोकसभेचे खासदार उद्धव ठाकरे गटात आहेत. शिवसेनेकडे उमेदवार नाही. त्यामुळेच आता कल्याणच्या बदल्यात ठाणे असा भाजपचा आग्रह आहे. भाजपमधून माजी खासदार संजीव नाईक, विद्यमान आमदार संजय केळकर, संदीप लेले, विनय सहस्रबुद्धे अशी काही नावे चर्चेत आहेत. आपल्यालाच तिकीट मिळावे, यासाठी नवी मुंबईतील एका इच्छुकाने थेट दिल्लीचे दार ठोठावल्याची चर्चा आहे.

टॅग्स :thaneठाणेlok sabhaलोकसभा