शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या त्या तीन आमदारांच्या मतदारसंघावर भाजपाचा डाेळा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला

By मुरलीधर भवार | Updated: October 2, 2022 16:13 IST

Thane News: ठाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे. 

- मुरलीधर भवार 

डाेंबिवली - बंड करणारे तीन आमदार ठाणे जिल्ह्यातील आहे. यातील एकाला पालकमंत्री केले असते तर लोकांची कामे झाली असती असा टोला राषट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. आत्ता कल्याण पश्चिमेतील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे काय होणार शेवटी शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे. 

डोंबिवलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते तपासे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. राज्यातील सांस्कृतिक विभागाने हॅलो ऐवजी वंदे मातरम्चे बोला असे आदेश काढले आहे. हे काही नवीन नाही. ग्रामीण भागात लोकं बोलतात. आम्ही फार मोठे देशभक्त आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत आहेत. कोणतीही गोष्टीत दबावाने आणि स्वयंस्फूर्तीने झाली पाहिजे याकडे तपासे यांनी लक्ष वेधले आहे. शंभराजे देसाई यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यावर तपासे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी ठाणे जिल्ह्यात राहणारे असले तरी त्यांचे मूळ गाव हे सातारा जिह्र्यात आहे. शंभूराजे देसाई हे देखील सातारा जिह््याचे असल्याने कदाचित आपल्या गावचा एक सहकारी म्हणून त्यांना ठाणे जिल्हा पालक मंत्री पदाची जबाबदारी दिली असेल. दुख एकच वाटते. बंड करण्यात ठाणे जिल्ह्यातील प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर आणि विश्वनाथ भोईरत आहेत. यांच्यापैकी एका पैकी कोणाला ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाचा जबाबदारी दिली असती तर कल्याण डोंबिवलीचा चांगला विकास झाला असता असे तपासे यांनी सांगितले.

इतकेच नाही तर प्रताप सरनाईक आणि शिंदे यांच्या नाराजी आहे. त्यावर तपासे यांनी सांगितले की, भाजप हा शिंदे गटाचा राजकीय उपयोग करुन घेत आहे. ते जवळपास महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना माहिती आहे. ज्यांनी बंड केले त्या 40 पैकी आमदारांना माहिती आहे की, पुढच्या वेळेस त्यांना काही ना काही त्रसा सामोरे जावे लागेल. भाजप डोळा ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदार संघावर आहे. त्याच्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. जो ईडीचा क्लोजर रिपोर्ट सरनाईक यांच्या संदर्भात दाखल झाला होता. तो पुन्हा उघडकीस आणला जातो की काय अशी चर्चा सरेआम सुरु झालेली आहे.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा