शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांसाठी महामंडळ, मुख्यमंत्रीही दूर, अच्छे दिनाची प्रतीक्षा संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 03:04 IST

डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती.

अनिकेत घमंडीडोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. पण जसजशा पुढील निवडणुका समीप येत आहेत तसतशी कार्यकर्त्यांमध्येच अच्छे दिन कधी येणार अशी चर्चा सुरु असून महामंडळांचेही गाजर दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे महामंडळ दूर असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट होत नसल्याने नगरसेवक-कार्यकर्ते नाराज असल्याची उघड चर्चा आहे.नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात मनसेचे डोंबिवलीतील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले, पण तेथे गेलेल्या डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांची मात्र मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नसल्याची सल ‘लोकमत’शी बोलतांना जुन्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमधून पक्षाला तीन आमदार, एक खासदार मिळाले. मुरबाडची आमदारकीही भाजपाने राखली. त्यामुळे कार्यकर्त्यांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. सत्तेची तीन वर्षे उलटली. पण अद्यापही महामंडळांचा निर्णय नाही, आता काय पदरी मिळणार? सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही गाजरच मिळाल्याची चर्चा उघडपणे सुरु आहे. २०१४ मध्ये लोकसभेला युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभेमध्ये सत्ता येण्यासाठी कार्यकर्ते राबले. केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपाची सत्ता आली, त्यामुळे अच्छे दिन येणार अशी आशा निर्माण झाली. पण कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार ५०० कोटींच्या पॅकेजचे दाखवलेल्या गाजर उपक्रमाची कार्यकर्त्यांनीही आधी मजा लुटली, पण त्यानंतर त्यांच्यामध्येही आता तीन वर्षांनंतर सर्वसामान्यांप्रमाणेच आपल्यालाही गाजर मिळाल्याची भावना आहे.मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेत निधीच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही डोंबिवलीकरांना घेऊन जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण बालेकिल्ला म्हणवल्या जाणाºया कल्याण-डोंबिवलीतील भाजपाच्या नगरसेवकांना मात्र मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने उघडपणे खंत व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीत ज्या पद्धतीचे राजकारण झाले ते पाहता पक्षाला जर पुन्हा यश मिळवायचे असेल तर आतापासून किमान प्रश्न समजून घेण्याची तयारी करायला हवी. पण ज्यांनी त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे ते मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांना लगेच वेळ देतात. मनसेच्या नेत्यांना भेटतात, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बेटण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही, याबद्दलची तीव्र नाराजी पक्षात आहे.>दगाफटक्याची भीतीलोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा तोंडावर आल्या असून भाजपामध्ये असलेली खंत वाढत गेली तर मात्र पक्षाची कोंडी वाढेल. त्यातच विधानसभाही लोकसभेच्या निवडणुकांसोबतच घेतली; तर मात्र कार्यकर्त्यांना जोमाने काम करावे लागेल. तो उत्साह, जोश टिकवून ठेवण्यासाठी आतापासूनच विशेष प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पक्षासमोरील अडचणी आणि अंतर्गत कुरबुरी वाढल्या तर निवडणुकांना सामोरे जाताना दगाफटका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस