शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 07:49 IST

Jitendra Awhad : भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोमवारी पहाटे मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

ठाणे/मुंब्रा : भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोमवारी पहाटे मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. अवघ्या ७२ तासांमध्ये त्यांच्या विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

आपल्यावरील आरोपाने उद्विग्न झालेल्या आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाड यांची पाठराखण करताना आमदारकीचा राजीनामा न देण्याचा सल्ला दिला.

उड्डाणपुलाचे रविवारी सायंकाळी वाय जंक्शन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आव्हाड हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे त्यांच्या वाहनामधून पुढच्या कार्यक्रमाला निघाले होते. त्याच वेळी त्यांच्या वाहनाच्या डाव्या बाजूला भाजप महिला मोर्चाची एक पदाधिकारी महिला उभी होती. गर्दीतून वाट काढताना आव्हाड हे त्या महिलेला खांद्याला हात लावून ‘बाजूला हो’ असे म्हणाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला पदाधिकाऱ्याने आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्यानंतर थेट ठाण्याचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्याकडे तक्रार केली.

गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विनयभंगासारखा गलिच्छ आरोप आपल्यावर लागला नाही. - जितेंद्र आव्हाड 

संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. महिला अधिकारी याचा तपास करीत आहेत. तपासाअंती यात कायदेशीर कारवाई केली जाईल.- गणेश गावडे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर.

अटकेपासून दिलासाजितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला आहे. मंगळवारी सकाळी ११ ते सुनावणी पूर्ण होईपर्यंत आव्हाड यांच्याविरुद्ध अटकेसारखी कारवाई करू नये, असे तोंडी निर्देश ठाण्याचे सत्र न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी मुंब्रा पोलीस आणि सरकारी वकिलांना दिल्याची माहिती ॲड. गजानन चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्रा