शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘एकसंध देशासाठी भाजपाला हटवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:07 IST

भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला.

उल्हासनगर : देशाला एकसंध ठेवण्यासाठी भाजपामुक्त देश करा, असे आवाहन पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकत्रित जयंतीनिमित्त कवाडे शहरात आले होते.उल्हासनगर पीआरपी पक्षाच्या वतीने कॅम्प नं.-१, जुना बस स्टॉपजवळ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कवाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या रोखठोक भाषणात मोदी-फडणवीस सरकारवर आसूड ओढले. देशात जातीजातींमध्ये कधी नव्हे एवढा तणाव निर्माण झाला असून नागरिकांची मने कलुषित झाली आहेत. प्रत्येक नागरिक एकमेकांकडे जातीच्या चष्म्यांतून बघू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला. देशाला ज्ञानाचा मार्ग सांगणारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आदींची दिवसाढवळ्या हत्या होऊन अद्याप आरोपी सापडत नाही किंवा त्यांना शोधायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.कोरेगाव-भीमा घटनेतील आरोपी सापडत नाही. मात्र, शांततेत महाराष्ट्र बंद करणाऱ्या ५८ हजार दलित नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरू केली. शेतकरी, कामगार, दलित, मुस्लिम समाजाची मुस्कटदाबी होत असल्याचे ते म्हणाले.