शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

सेनेचा भाजपाला दे धक्का?

By admin | Updated: January 30, 2017 02:02 IST

भाजपाशी यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आणि मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेला टाळी देण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद कल्याण

प्रशांत माने, कल्याणभाजपाशी यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आणि मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेला टाळी देण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही उमटू लागले आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देऊन औकात दाखवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच, अचानकपणे मनसेतील हालचालींनाही वेग आला असून बदलत्या समीकरणांबाबत पक्षात खलबते सुरू आहेत. त्यामुळे सव्वा वर्षासाठी हे पद मनसेलाही दिले जाऊ शकते, असे संकेत देण्यास शिवसेनेच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्याची अंमलबजावणी करू, असे सांगत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळले; तर भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी केडीएमसीतील युती कायम राहील. युती तोडण्याचा निर्णय पुढील निवडणुकीसाठी असल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजपामधील संबंध विकोपाला गेले आहेत. मुंबईतील सभांमध्ये औकात दाखवण्यापासून पाणी पाजण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत संतापाची भावना आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी परस्परांवर चिखलफेक करत उणीदुणी काढली होती. या लढाईत भाजपाच्या जागा वाढल्या खऱ्या, पण शिवसेनेची सत्ता उलथणे, त्यांना शक्य झाले नाही. शिवसेनेलाही बहुमत सिद्ध करण्यासाठी संख्याबळ अपुरे पडल्याने नाइलाजास्तव भाजपाच्या गळ्यात गळे घालून पुन्हा युती करणे भाग पडले. सत्तेतील ही युती केवळ नावाला असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत असून महासभेच्या वेळी या दोन्ही पक्षांमधील मतभेद आणि त्यातून उद्भवणारे तंटे पाहता बहुतांश वेळा भाजपा या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकदा तरी भाजपाला धडा शिकवावा, अशी येथील शिवसैनिकांची भावना आहे. त्यासाठी उपमहापौरपदाच्या निवडणुकीची संधी आयती चालून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.भाजपाचे उपमहापौर विक्रम तरे यांनी वर्षाचा कालावधी संपल्याने पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या गटनेत्यांकडून तो राजीनामा महापौर राजेंद्र देवळेकरांकडे देण्यात आला. तो त्यांनी मंजूर केला. त्यामुळे लवकरच या रिक्त पदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. ती फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.त्यासाठी महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येथे युती कायम ठेवली, तर १० पालिकांच्या निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती तोडावी आणि जे पक्ष सहकार्य करतील, त्यांना संधी द्यावी, असा मतप्रवाह पक्षात आहे.मनसेचा पाठिंबा?सद्य:स्थितीत १२२ जागांपैकी नऊ अपक्षांच्या सहकार्याने शिवसेना ५७, भाजपा ४७, मनसे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, बसपा १ आणि एमआयएम १ असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ६३ संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे मनसेने पाठिंबा दिला, तर शिवसेना उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.