शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, ओमी टीममध्ये लक्षवेधीवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 02:25 IST

महासभेत पंचम कलानी यांची पाणीटंचाई व बोअरवेलवरील लक्षवेधी महापौरांनी स्वीकारली नसल्याच्या निषेधार्थ ओमी टीमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. या प्रकाराने ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला असून भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सिंधू भवनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केल्याने वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर : महासभेत पंचम कलानी यांची पाणीटंचाई व बोअरवेलवरील लक्षवेधी महापौरांनी स्वीकारली नसल्याच्या निषेधार्थ ओमी टीमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. या प्रकाराने ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला असून भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सिंधू भवनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केल्याने वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिकेत भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. मात्र तिन्ही पक्षातील वाद चव्हाटयावर येत असल्याने शहर विकासावर परिणाम होत आहे. महासभेपूर्वी ओमी कलानी यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन कबरस्तानासह अन्य विकासात्मक कामावर चर्चा केली. तर दुसऱ्याच दिवशी मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यार् पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह महापौर मीना आयलानी, भाजपा शहराध्यक्ष कुमार आयलानी उपस्थित होते. ओमी टीम-भाजपा व साई पक्षात श्रेयाची लढाई सुरू असून शहराचे हित बाजूला पडल्याची टीका होत आहे.महासभेत एकूण ८ लक्षवेधी चर्चेसाठी आल्या होत्या. त्यापैकी महापौर व पिठासीन अधिकारी मीना आयलानी यांनी भाजपा नगरसेविका मीना सोंडे यांची डम्पिंग ग्राउंडवरील व शिवसेनेचे सुनील सुर्वे यांची दुसरी लक्षवेधी स्वीकारली. तर इतर लक्षवेधी फेटाळल्या. पंचम कलानी यांनी पाणीटंचाई व बोअरवेलबाबतची लक्षवेधी महापौरांकडे दिली होती. मात्र महापौरांनी ती स्वीकारली नाही. शहरात पाणीटंचाई असताना आपली लक्षवेधी का स्वीकारली नाही, याचा जाब कलानी यांनी विचारला. यापेक्षा इतर लक्षवेधी चांगल्या असल्याचे सांगून, तुमच्या लक्षवेधीवरही महासभेत चर्चा करू, असे उत्तर महापौरांनी दिले.पाणीटंचाई असतानाही लक्षवेधी स्वीकारली नसल्याचा राग कलानी यांच्यासह टीमच्या नगरसेवकांना आला. कलानी यांनी नगरसेवक राजेश वधारिया, लक्ष्मी सिंग, जयश्री पाटील, छाया चक्रवर्ती, कविता तोरणे, कविता गायकवाड, रेखा ठाकूर व सरोजनी टेकचंदानी आदींनी सभात्याग केला. शहरातील अर्ध्याअधिक बोअरवेल बंद असून त्यांची दुरूस्ती आधीच्या कंत्राटदाराने करायला हवी होती, असे ओमी टीमचे म्हणणे होते. भाजपाच्या एका नगरसेवकाच्या मुलाने या कामाचे कंत्राट घेतल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्याने एकच खळबळ उडाली.सिंधू भवन वादातसपना गार्डन येथे ४ कोटीच्या निधीतून सिंधू भवनाचे काम सुरू असून निविदेप्रमाणे भवनाचे काम सुरू नसल्याचा आरोप भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला. त्यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करून, सिंधू भवनाच्या कामात ओमी टीमच्या पदाधिकाºयाच्या जवळच्या कंत्राटदाराचा सहभाग असल्याचे त्यांनी सोशल मिडीयावर सांगून टाकले. याप्रकाराने भाजपा व ओमी टीममधील वाद चव्हाटयावर आला.भाजपातील गट एकत्र येण्याची शक्यता?शहर भाजपात दोन गट असून विधानसभा निवडणुकीत पक्षातील एका गटाच्या विरोधी कामामुळे कुमार आयलानी यांचा पराभव झाल्याचे बोलले जात होते.तसेच ओमी कलानी यांना भाजपात आणण्यासाठी याच निष्ठांवत गटाचा हात होता. मात्र पक्षातील दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ओमी टीम बाजूला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकाराने ओमी टीमला जाणारे महापौरपदासह आमदार पदावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर