शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पदाधिका-याची भाईंदर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकास दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:33 IST

पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकास भाजपाच्या पदाधिका-याने दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली

मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दुचाकीवरून गस्त घालत बाहेर जमलेल्या लोकांना घरी जा म्हणून सांगणा-या भाईंदरच्या पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकास भाजपाच्या पदाधिका-याने दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाने 20 बळी घेतले असून, 577 जणांना लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पोलीस देखील गस्त घालून लोकांना बाहेर गर्दी करू नका म्हणून सांगत आहेत. आज गुरुवारी भाईंदरच्या देवचंद नगर परिसरात भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक ए . के . पाटील हे दुचाकीवरून गस्त घालत होते. त्या ठिकाणी काही लोकं रस्त्यावर जमलेली व गप्पा गोष्टी करताना दिसली म्हणुन लोकांना थांबू नका, घरी जा असे त्यांनी सांगितले.परंतु त्या ठिकाणी असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भरत कोठारी मात्र तेथेच थांबले. पोलिसाने सांगून देखील कोठारी गेले नाहीच, उलट दमदाटी सुरू केली. बघून घेईन, तुझी बातमी छापायला सांगेन अशी धमकी दिली. सदर प्रकाराची भाईंदर पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली आहे. तर या प्रकरणी मनसे, शिवसेना, काँग्रेस सह काही संस्थांनी निषेध व्यक्त करत भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी केली आहे. तर वरिष्ठ निरीक्षक आल्या नंतर गुन्हा दाखल करण्या बाबत निर्णय घेतील असे पोलीस सूत्रांनी सांगीतले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcorona virusकोरोना वायरस बातम्या