शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार किसन कथोरेंनी धरला ठेका; बाजार समिती निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा 

By पंकज पाटील | Updated: May 1, 2023 18:08 IST

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागा भाजपने कथोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आनंद साजरा केला.

बदलापूर : भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी रात्री कार्यकर्त्यांसोबत ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागा भाजपने कथोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आनंद साजरा केला. यावेळी कथोरे हे देखील कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले. 

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज पार पडली. १८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल ३३ उमेदवार रिंगणात असतानाही भाजपने तब्बल १५ जागांवर विजय मिळवत या बाजार समितीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयानंतर सर्वच विजयी उमेदवारांनी आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आनंद साजरा केला. यावेळी आमदार किसन कथोरे हे देखील कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले आणि त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. 

'शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इगो आडवा आला' स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर मात्र कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली असती, तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची माझी तयारी होती. त्यासाठी शिवसेनेला पाच जागा सोडण्याचीही तयारी मी दर्शवली होती. परंतु शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इओ आडवा आला आणि त्यामुळे ही युती झाली नाही आणि आता त्यांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले, असा गौप्यस्फोट किसन कथोरे यांनी केला. 

अंबरनाथ ग्रामीणमध्ये युतीत दरीकथोरे यांच्या या गौप्यस्फोटामुळे स्थानिक पातळीवर ग्रामीण भागात भाजप आणि शिवसेना यांच्यात दुफळी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आधी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाग होती. मात्र आमदार किसन कथोरे यांनीच प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करून ही बाजार समिती वेगळी करून घेतली. तेव्हापासून सलग आमदार किसन कथोरे यांचेच या बाजार समितीवर वर्चस्व राहिले आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूर