शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास भाजपा नेत्यांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:13 IST

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्याबाबत प्रथम भागधारक, सल्लागार व लोकप्रतिनिधींच्या घेण्यात आलेल्या बैठकीत, भाजपाच्या खासदार-आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी विरोध केला.

- सुरेश काटेतलासरी : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्याबाबत प्रथम भागधारक, सल्लागार व लोकप्रतिनिधींच्या घेण्यात आलेल्या बैठकीत, भाजपाच्या खासदार-आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी विरोध केला.तालुक्यातील ८ गावांतील १०९ भूखंड मिळून एकूण ३० हेक्टर जमीन या प्रकल्पात जाणार आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी तलासरी पंचायत समिती सभागृहात ही बैठक तहसीलदारांनी सोमवारी घेतली. या वेळी तहसीलदार विशाल दौडकर, सभापती सविता डावरे, उपसभापती दुमाडा, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.भाजपा खासदार चिंतामण वनगा व आमदार पास्कल धनारे यांनीही या प्रकल्पाला कडाडून विरोध करून, आदिवासी शेतकºयांच्या मुळावर असलेल्या प्रकल्पाच्या विरोधात शेतकºयांची बाजू घेऊन, आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत.आमदार पास्कल धनारे यांनी यापूर्वीच बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला होता, तर भाजपाचे करज गावाचे सरपंच लुईस काकड यांनी भर सभेत आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे असलो, तरी बुलेट ट्रेन आदिवासी शेतकºयांच्या फायद्याची नसून, त्याने शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत प्रकल्पाला विरोध केला. प्रसंगी शेतकºयांचे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.स्थानिकांना फायदाच नाहीतालुक्यातील मानपाडा, वसा, कवाडा, झरी, पाटीलपाडा, वरवाडा, आमगाव व उपलाट अशा ८ गावांतून बुलेट ट्रेन जाणार असून, त्यासाठी १०९ भूखंड आणि एकूण ३०.२६ क्षेत्र हेक्टर जमीन वापरली जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार तर नाहीच, शिवाय ट्रेनचे स्थानक येथे नसेल. त्यामुळे बुलेट ट्रेन फक्त धनदांडग्यासाठी असल्याचा आरोप करीत या प्रकल्पाला जमिनी न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन