शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भाजपाचे दिग्गज नेते तथा माजी आमदारांनी राजकारण सोडल्याचे केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 23:14 IST

मेहतांनी आज सोमवारी सायंकाळी आपल्या फेसबुकवर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून भाजपासह राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देमेहतांनी आज सोमवारी सायंकाळी आपल्या फेसबुकवर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून भाजपासह राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होत असून, भाजपा नेत्यांना लाज वाटेल, असे काही होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे मेहतांनी म्हटले आहे.मेहतांच्या वक्तव्यातून पक्षाचे त्यांच्यामुळे नुकसान होत असल्याचे तसेच नेत्यांना लाज वाटेल, असे सहन होणार नाही. म्हणून भाजपा व राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदर भाजपाचे सर्वेसर्वा तथा वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहतांनी आज सोमवारी सायंकाळी आपल्या फेसबुकवर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून भाजपासह राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होत असून, भाजपा नेत्यांना लाज वाटेल, असे काही होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे मेहतांनी म्हटले आहे. मेहतांच्या वक्तव्यातून पक्षाचे त्यांच्यामुळे नुकसान होत असल्याचे तसेच नेत्यांना लाज वाटेल, असे सहन होणार नाही. म्हणून भाजपा व राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आज सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मेहतांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर भाजपा व राजकारण सोडत असल्याची पोस्ट टाकली. नंतर एका तासाने त्यांनी स्वत:चा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला. मी गेल्या ११ वर्षांपासून भाजपात काम करत आहे. अनेक चढ-उतार आले. सुखाचे व दु:खाचे क्षण आले. संघर्ष आले. कार्यकर्ता, जनता, नगरसेवकांनी साथ दिली. पण आज अशा वळणावर उभा आहे की, माझ्यामुळे भाजपाचे नुकसान होत आहे. माझ्या कृती, पद्धतीमुळे वा माझ्या आचरणामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना लाज वाटेल, नमावे लागेल हे मी सहन करू शकत नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देतोय. मी भाजपाचा सच्चा कार्यकर्ता असल्याने अन्य पक्षात जाणारा नाही व राजकारण देखील करणार नाही.काही लोकांना यात देखील राजकारण वाटेल. काहींना मस्करी वाटेल. तर काहींना महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक कारण वाटेल. पण तसे काही नसले तरी काही कारण आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वांची मनापासून माफी मागतो. विशेष करुन सर्वच राजकिय पक्षांची पण माफी मागतो. कारण या समाजसेवेच्या मार्गावर अनेक असे काही करावे लागले ज्याने ते दुखावले असतील. मला विश्वास आहे की, माझ्या चुका झाल्या असतील तर तुम्ही मला माफ कराल. माझ्या नशिबात राजकारण इथपर्यंतच होते आणि ही योग्य वेळ पण आहे. सर्वांचे आभार मानतो की इथपर्यंत साथ दिलीत. पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो. माझ्यामुळे पक्षाला खूप काही नुकसान सहन करावे लागले. पण हे कोणाचा दबावामुळे वा राजकीय दबावमुळे नाही तर मनापासून करतोय, असे मेहतांनी व्हिडिओत म्हटले आहे.वाद आणि क्लिपनंतर घडले राजीनामानाट्यभाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी महापौरपदासाठी दावेदारी केली होती. त्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. पण नीला यांना उमेदवारी देण्यात आली नाही. सायंकाळी त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या दालनात आल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची फोनवरुन कोणाशी तरी महापौरपदावरून खडाजंगी झाली. नंतर त्यांनी भाजपा नेते तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक व्हिडिओ क्लीप पाठवली. त्या नंतर अवघ्या तासाभरात मेहतांनी फेसबुक वर भाजपा व राजकारण सोडल्याचे जाहीर केले. याबाबत चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.मेहतांचा राजकीय प्रवासमीरा भाईंदर महापालिकेत ऑगस्ट २००२ साली नरेंद्र मेहता पहिल्यांदा निवडून आले. डिसेंबर २००२ मध्ये त्यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी लाच घेताना पकडण्यात आले. काँग्रेसने अधिकृत उमेदवार शानू गोहिल यांना पाडून अपक्ष असलेल्या मेहतांना प्रभाग समिती सभापतीपदी निवडून दिले. २००७ मध्ये अवघे दोन नगरसेवक असताना मेहतांनी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, बविआ, बसपा व जनता दल (से) ला एकत्र आणून महापौरपद मिळवले. त्यावेळी काँग्रेसच्या चंद्रकांत वैतींना पराभूत केले होते. पुढे ज्या गिल्बर्ट मेंडोन्सांमुळे मेहता महापौर झाले त्याच मेंडोन्सांविरोधात मेहतांनी २००९ साली भाजपातून उमेदवारी मिळवत विधानसभा निवडणूक लढवली. पण मेंडोन्सांनी मेहतांचा पराभव केला. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत मात्र मेंडोन्सा यांचा पराभव करून मेहता आमदार झाले. २०१५ साली शिवसेना, बविआला सोबत घेऊन पालिकेत पहिल्यांदा भाजपाची सत्ता आणली. गीता जैन महापौर झाल्या. २०१७ साली पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली. आमदार झाल्यापासून मेहतांनी पालिका आणि पक्षावर पूर्णपणे आपली पकड बसवली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर मेहता अगदी खास आमदार मानले जायचे. फडणवीस स्वत: शहरात अनेकवेळा मेहतांच्या बोलावण्यावरून आले.परंतु मेहतांनी आमदार झाल्यावर व एकहाती सत्ता आल्यावर मनमर्जीचा कारभार सुरू केला. महापालिका प्रशासनासह पोलीस, महसूल आदी मेहतांच्या तालावर नाचू लागले. मेहता सांगेल तशी कारवाई व निर्णय होऊ लागले. अनेक वादग्रस्त निर्णय व कामकाज झाले. मनाला येईल त्याची बांधकामे तुटू लागली तर अनेकांची वाचवली जाऊ लागली. त्यामुळे मेहता नेहमीच आरोप आणि टीकेचे धनी ठरले. अल्पावधीतच ते शहरात राजकिय व्हिलन ठरले. त्यांच्या विरोधात २० च्या घरात दाखल गुन्हे, अनेक तक्रारी व दावे या मुळे ते सतत वादग्रस्तच राहिले. भ्रष्टाचाराचे, गैरप्रकाराचे, मनमानीचे त्यांच्यावर आरोप झाले. लोकायुक्तांनी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी सुरू केली. त्यांचे अनेक प्रकल्प वादात आहेत. यातूनच २०१९ सालच्या निवडणुकीत मेहतांचा जनतेने पराभव केला आणि गीता जैन यांना आमदार म्हणून निवडून दिले. पण पराभवानंतर देखील मेहतांनी पक्ष व महापालिकेवर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. गीता यांना पक्ष निर्णयात सतत डावलण्यात ते यशस्वी देखील ठरले.