शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

भिवंडीत भाजपाला आले ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 10, 2017 01:10 IST

भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसू नये, याकरिता जंगजंग पछाडलेल्या भाजपाचा अखेर मुखभंग झाला असून, आपल्या पुतण्याला

पंढरीनाथ कुंभार । लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसू नये, याकरिता जंगजंग पछाडलेल्या भाजपाचा अखेर मुखभंग झाला असून, आपल्या पुतण्याला महापौरपदी बसवण्याचे खासदार कपिल पाटील यांचे स्वप्न भंगले आहे. काँग्रेसला भक्कम जनाधार लाभल्याने त्यांच्यापुढील सत्तेचे ताट ओढून घेता येत नाही, हे पाहिल्यावर भाजपाने सतत कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेत फूट पाडून आपल्या मित्रपक्षाला धक्का देण्याचे मनसुबे रचले होते. मात्र, तेही फलद्रुप झाले नाहीत.काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही त्या पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेतले. मागील वेळी भिवंडीत काँग्रेस व शिवसेना हे भिन्न जातकुळीचे पक्ष सत्तेत होते. राज्यात सत्ता असलेला भाजपा काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाषा करत होता आणि त्यांनी तसे काही केले, तरी जनमताचा कौल मिळूनही महापौर पराभूत होऊ नये, याकरिता काँग्रेसने शिवसेनेचा हात घट्ट धरला. त्यामुळेच महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी, तर उपमहापौरपदी मनोज काटेकर हे विजयी झाले. देशभर सत्ता असलेल्या भाजपाच्या डोळ्यांत भिवंडीसारख्या छोट्या शहरातील काँग्रेसची सत्ताही खुपत आहे. फाटाफुटीत अपयशमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४७, शिवसेनेचे १२, समाजवादीचे २ व अपक्ष १ अशा एकूण ६२ नगरसेवकांची मते मिळाली, तर भाजपाच्या उमेदवाराला भाजपाचे १९, कोणार्कचे ४, आरपीआयचे ४ व अपक्ष १ अशी एकूण २८ मते मिळाली. शिवसेनेत मतभेद : उपमहापौरपद आपल्याला मिळावे, अशी इच्छा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदन कृष्णा नाईक यांची होती. शिवसेनेतील काटेकर व नाईक या मतभेदांचा फायदा उठवत शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाने अखेरपर्यंत करून पाहिला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर नाईक यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांनी मनोज काटेकरांना धड शुभेच्छाही दिल्या नाहीत. शिवसेनेतील रुसव्याफुगव्यांचे दर्शन साऱ्यांना घडले.