शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

भिवंडीत भाजपाला आले ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 11, 2017 02:50 IST

भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसू नये, याकरिता जंगजंग पछाडलेल्या भाजपाचा अखेर मुखभंग झाला असून, आपल्या पुतण्याला महापौरपदी बसवण्याचे खासदार कपिल पाटील

- पंढरीनाथ कुंभार ।  लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसू नये, याकरिता जंगजंग पछाडलेल्या भाजपाचा अखेर मुखभंग झाला असून, आपल्या पुतण्याला महापौरपदी बसवण्याचे खासदार कपिल पाटील यांचे स्वप्न भंगले आहे. काँग्रेसला भक्कम जनाधार लाभल्याने त्यांच्यापुढील सत्तेचे ताट ओढून घेता येत नाही, हे पाहिल्यावर भाजपाने सतत कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेत फूट पाडून आपल्या मित्रपक्षाला धक्का देण्याचे मनसुबे रचले होते. मात्र, तेही फलद्रुप झाले नाहीत.काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही त्या पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेतले. मागील वेळी भिवंडीत काँग्रेस व शिवसेना हे भिन्न जातकुळीचे पक्ष सत्तेत होते. राज्यात सत्ता असलेला भाजपा काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाषा करत होता आणि त्यांनी तसे काही केले, तरी जनमताचा कौल मिळूनही महापौर पराभूत होऊ नये, याकरिता काँग्रेसने शिवसेनेचा हात घट्ट धरला. त्यामुळेच महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी, तर उपमहापौरपदी मनोज काटेकर हे विजयी झाले. देशभर सत्ता असलेल्या भाजपाच्या डोळ्यांत भिवंडीसारख्या छोट्या शहरातील काँग्रेसची सत्ताही खुपत आहे. शिवसेनेत मतभेद : उपमहापौरपद आपल्याला मिळावे, अशी इच्छा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदन नाईक यांची होती. शिवसेनेतील काटेकर व नाईक या मतभेदांचा फायदा उठवत शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाने अखेरपर्यंत करून पाहिला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर नाईक यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांनी मनोज काटेकरांना धड शुभेच्छाही दिल्या नाहीत. सेनेतील रुसव्याफुगव्यांचे दर्शन साऱ्यांना घडले. फाटाफुटीत अपयश :महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४७, शिवसेनेचे १२, समाजवादीचे २ व अपक्ष १ अशा एकूण ६२ नगरसेवकांची मते मिळाली, तर भाजपाच्या उमेदवाराला भाजपाचे १९, कोणार्कचे ४, आरपीआयचे ४ व अपक्ष १ अशी एकूण २८ मते मिळाली.