शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अखेर भाजपा झुकली; साई पक्षाच्या मागण्या मान्य, रस्ते विकासासाठी १५३ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:29 IST

निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

उल्हासनगर : निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने साई पक्षाच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया साई पक्षाचे नेते आणि उपमहापौर जीवन इदनानी यांनी दिली. कामांची प्रगती पाहून सत्तेतून बाहेर पडण्यावर मार्च अखेरनंतर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. या बैठकीमुळे उल्हासनगरचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली.उल्हासनगरच्या ठप्प विकासकामांवरून साई पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत भाजपाचे प्राण कंठाशी आणले होते. पालिकेवरील सत्ता जाऊ नये म्हणून भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी इदनानी यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला आणि विकासकामांवर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिका आयुक्त राजेद्र निंबाळकर, महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, भाजपचे शहर अध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेता जमनुदास पुरस्वानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, ओमी टीमचे प्रमुख ओमी कालानी, प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते. त्यात १५३ कोटी खर्चून नऊ रस्त्यांचा विकास, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड या रेल्वे स्टेशनचा विकास, अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचा विकास, तेथील बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर