शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘पिचड पितापुत्राला भाजपने प्रवेश न देण्याची कोळी समाजबांधवांची मागणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:33 IST

विशेष म्हणजे, वैभव पिचड यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेशही केला आहे.

ठाणे : राज्यातील विस्तारित क्षेत्रातील पीडित आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमातबांधवांना घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवून देशोधडीला लावणारे राष्टÑवादीचे नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड तसेच त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी आदिवासी महाराष्टÑ कोळी व तत्सम जमातबांधवांच्या वतीने महादेव कोळी समाज संघाचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली आहे.

विशेष म्हणजे, वैभव पिचड यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. त्यामुळेच कुणाला पक्षात प्रवेश द्यावा, कोणाला नाही, कोणाला काढायचे, हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, त्यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचेही तरे यांनी म्हटले आहे. परंतु, शिवसेना-भाजप युतीचा एक पदाधिकारी, माजी आमदार, युतीचा माजी महापौर आणि महाराष्टÑ कोळी समाज संघटनेचा राष्टÑीय अध्यक्ष या नात्याने हे निवेदन देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमातबांधवांना घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवून, तसेच समाजबांधवांना व्यवसाय, शिक्षण, नोकरी तसेच राजकारणाच्या सवलतींपासून वंचित ठेवले आहे.अशा अनेक प्रकारे अन्याय करणाऱ्या स्वत: मधुकर पिचड यांचा जातीचा दाखला मात्र बोगस आहे. त्यांनी आपले देशमुख हे नाव बदलून पिचड हे नाव ठेवले आहे.दाखल्याची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी यापूर्वीच केल्याची आठवणही तरे यांनी करून दिली आहे. पिचड यांच्या कालखंडात गोवारी समाजाचे हत्याकांड झाले. ते आदिवासी विकासमंत्री असताना त्यांच्यावर आदिवासी खात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा, तसेच त्यांनी केलेल्या अनेक प्रकल्पांमधील कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचाही त्यांनी आरोप केला. भाजप- शिवसेना सत्तेकडून आदिवासी महादेव कोळीबांधव तसेच तत्सम जमातबांधवांना न्यायाची अपेक्षा आहे.

टॅग्स :Madhukar Pichadमधुकर पिचडthaneठाणेBJPभाजपा