शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचे भाजपकडून लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:14 IST

भिवंडीमध्ये श्रेयवादाची लढाई। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी आॅनलाइन उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केलेल्या कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल पूर्ण झाला असताना उद्घाटनावरून शिवसेना-भाजप या पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.सोमवारी या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आॅनलाइन लोकार्पण करणार होते; मात्र शनिवारी भाजप आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी उद्घाटन करीत वाहतुकीसाठी पूल खुला केला. शहरातील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्ही मागणी करीत असताना फडणवीस यांचे योगदान मोठे असून त्यांनी या उड्डाणपुलास मंजुरी देऊन भूमिपूजन केले होते. असे असताना स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते आॅनलाइन करणार आहे. कोरोनाकाळात बाहेर न पडलेले मुख्यमंत्री यांना दीड महिन्यापासून तयार असलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना लोकार्पणासाठीही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. महाविकास आघाडी सरकार जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप आमदार चौघुले यांनी केला आहे.दरम्यान, हा पूल सुरुवातीपासूनच श्रेयवादाने वादग्रस्त ठरला असून, याच्या भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करताच त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी या पुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी भाजपने या पुलाचे लोकार्पण करून या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.खरे श्रेय फडणवीसयांना - संतोष शेट्टीफडणवीस मुख्यमंत्री असताना प्रथमच भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले; परंतु त्यातील सुरू असलेल्या कामांना शिवसेना सरकार स्थगिती देऊन भिवंडीच्या नागरिकांवर अन्याय करीत असल्याने या उड्डाणपुलाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे असल्याने भाजपने लोकार्पण केले, अशी प्रतिक्रिया शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.