शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएए’ विरोधकांवर भाजपचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:07 IST

भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून सभा उधळून लावली

मीरा रोड : एनआरसी, सीएए आणि एनपीआरच्या विरोधात चौकसभा घेणाऱ्या कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून सभा उधळून लावली. यावेळी मारहाण आणि शिवीगाळ करून गाडीची काचही फोडण्यात आली असून, भार्इंदर पोलीस ठाण्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकाजवळील जय अंबेनगर झोपडपट्टी क्र. १ येथे रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी अ‍ॅड. किशोर सामंत, अताऊल्ला खान, अलोक गुप्ता, मोईन अन्सारी, श्रीनिवास सामंत आणि अन्य तीन कार्यकर्त्यांनी एनआरसी, सीएए व एनपीआर विरोधात जनजागृतीपर चौकसभा सुरू असतानाच भाजपचे कार्यकर्ते असलेले हे या परिसरातच राहणारे गुड्डु वर्मा आणि सुड्डू वर्मा हे भाऊ आणि त्यांचा एक साथीदार आला.त्यांनी चौकसभा बंद करा असे दरडावत शिवीगाळ, दमदाटी केली. अ‍ॅड. सामंत यांनी त्यांना विरोध केला असता त्यांच्या कपाळावर ठोसा मारला. श्रीनिवास यालाही धक्काबुक्की केली. तसेच अताउल्ला यांच्या गाडीची मागची काच यावेळी फोडली.हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी : गुड्डूवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नसून आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी अ‍ॅड. किशोर सामंत, प्रभाकर शेट्टी यांनी केली आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा