शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

मीरा भाईंदरमध्ये शिंदेसेनेच्या कंटेनर शाखांविरोधात भाजपा आक्रमक; शिंदेसेनेच्या कंटेनर शाखेप्रमाणेच भाजपाची कंटेनर कार्यालये थाटणार 

By धीरज परब | Updated: May 9, 2025 22:20 IST

Mira Bhayandar News: शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथ वर २०२३ सालात कंटेनर शाखांची उदघाटने केल्यावरून त्यावेळी राजकीय विरोध झाला होता. आता पुन्हा शहरात शिंदेसेनेने नव्याने कंटेनर शाखा रस्ते-पदपथ वर ठेवल्याने भाजपाने विरोध करत आता भाजपाची कंटेनर कार्यालये थाटण्याची तयारी सुरु केली आहे.

मीरारोड - शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथ वर २०२३ सालात कंटेनर शाखांची उदघाटने केल्यावरून त्यावेळी राजकीय विरोध झाला होता. आता पुन्हा शहरात शिंदेसेनेने नव्याने कंटेनर शाखा रस्ते-पदपथ वर ठेवल्याने भाजपाने विरोध करत आता भाजपाची कंटेनर कार्यालये थाटण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी देखील कंटेनर वरून टोलेबाजी केली आहे.

२०२३ मध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सुरवातीला ६ कंटेनर शाखांची उदघाटने केली होती. त्या नंतर आणखी काही कंटेनर शाखा थाटल्या.  भाजपा सह शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आदींनी सदर बेकायदा कंटेनर वर कारवाई करण्याची मागणी केल्या नंतर काही कंटेनर शाखा उचलल्या गेल्या. मात्र शिंदेसेनेने ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बेकायदा कार्यालये व बांधकामे याच्या तक्रारी केल्या. कालांतराने राजकीय विरोध थंडावला आणि कंटेनर शाखा अनेक ठिकाणी सुरु झाल्या.

दरम्यान, काही दिवसां पूर्वी भाईंदर पश्चिमेस शिवसेना गल्ली नाका येथे पदपथावर कंटेनर शाखा शिंदेसेनेने ठेवली. त्याला भाजपाने विरोध करत अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. क्रेनच्या सहाय्याने पालिका पथकाने कंटेनर शाखा उचलून नेली. मात्र काही वेळाने पालिकेनेच कंटेनर पुन्हा आणून फुटपाथ वर ठेवला. भाजपाचे राजेंद्र सिंह यांनी ठरत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना भेटून शिंदेसेनेच्या अनधिकृत कंटेनर शाखे बद्दल तक्रार केली. कंटेनरना परवानगी आहे का? आम्ही सुद्धा कंटेनर ठेऊ इच्छितो असे पत्र दिले. तसेच पालिकेने कारवाई केली नाही तर अन्य लोकांना सुद्धा कंटेनर ठेवण्यास सूट देण्याची मागणी केली. 

इतकेच नाही तर सिंह यांनी महापालिका आयुक्त यांच्या कनकिया येथील पालिका निवासस्थान समोरील पदपथावर भाजपाचे कंटेनर कार्यालयचे उदघाटन भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या हस्ते करण्या बाबतची निमंत्रण पत्रिकाच जाहीर केली आहे. आ. मेहता यांनी देखील, शहर एकदम लवारीस असून आयुक्त मोठ्या मनाचे असून दुकान विकत घेण्याची गरज नाही.  शहरात कुठेही फुटपाथवर  इस्टेट एजंट, दुकानवाले, कपडेवाले, राजकारणी, कार्यालये कंटेनर ठेऊन धंदा करू शकतात. सर्वाना सूट आहे. कुठेही कंटेनर लावा असा टोला लगावला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड