शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

बाळासाहेबांच्या स्मारकाचे जयंतीपूर्वीच होणार लोकार्पण

By admin | Updated: January 2, 2017 03:48 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळा तलाव परिसरात उभ्या राहत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळा तलाव परिसरात उभ्या राहत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये साकारलेला बाळासाहेबांचा पुतळा रविवारीच कल्याणकडे मार्गस्थ झाला आहे. या पुतळयाचे प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या सीमेवर वाजत गाजत स्वागत होत असल्याने सोमवारी सकाळी ९ वाजता कल्याण-शीळ मार्गावर हा पुतळा पोहोचेल अशी माहिती कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. २३ जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे. त्यादिवशी राज्यभर भरपूर कार्यक्रम असल्याने तत्पूर्वीच म्हणजे येत्या रविवारी, ८ जानेवारीला या स्मारकाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारावे, असा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत संमत करण्यात आला. हा प्रस्ताव तत्कालीन सभागृह नेते रवींद्र पाटील यांनी मांडला होता. प्रस्तावित स्मारकासाठी एक कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली. स्मारकासंदर्भात केडीएमसीने संकल्पचित्रे मागविली होती. ती चार संस्थांकडून मिळाली. त्यातील शशी प्रभू अ‍ॅन्ड असोसिएटस या संस्थेच्या संकल्पचित्राला पसंती देण्यात आली. काळा तलाव परिसरातील एक एकर भूखंडावर बाळासाहेबांचे स्मारक उभे राहत आहे. प्रत्यक्षात कामाला २०१४ मध्ये प्रारंभ झाला. बाळासाहेबांचा पुतळा कोल्हापुरात शिल्पकार संताजी चौगुले यांनी यांनी साकारला आहे. चार हजार किलो वजनाचा आणि २२ फूट उंच असा हा भव्य पुतळा आहे. काम पूर्ण झाल्याने रविवारी हा पुतळा कोल्हापूर येथून जल्लोषात कल्याणला निघाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा आणण्यासाठी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक सुधीर बासरे, माजी नगरसेवक सचिन बासरे आदी कल्याणमधील पदाधिकारी शनिवारीच कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी विधीवत पूजा करून हा पुतळा कल्याणला मार्गस्थ झाला. यावेळी स्थानिक आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. पुतळा साकारणाऱ्या संताजी चौगुले यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कल्याणमध्येही पुतळ््याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते चौकाचौकांमध्ये ढोल ताशांच्या गजरात या पुतळयाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येऊ घातलेली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकांची लागू होणारी आचारसंहिता, निवडणूक प्रचारात गुंतून पडणारे नेते यांचा विचार करून बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वीच स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)