शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी आले अंगणी; एमआयडीसीमध्ये घेतली भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:07 IST

मिलापनगर मधील रहिवासी असलेले आर्किटेक्ट विवेक परांजपे यानी आपल्या बंगल्याच्या खिडकीत पक्षांना खाद्य पुरवण्यासाठी बर्ड फिडर ही वस्तू काही दिवसांपूर्वी लावली होती.

अनिकेत घमंडीडोंबिवली : एमआयडीसी मिलापनगर मध्ये पक्षांचे अस्तित्व वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. फार कमी प्रमाणात दिसणारे पोपट, साळुंक्या, चिमण्या, भारद्वाज, लवबर्ड सारखे दिसणारे इत्यादी अनेक प्रकारचे पक्षी सद्या दिसू लागले आहेत. त्याला प्रदूषण कमी झाले हे कारण जरी असले तरी येथील असलेले मोठे वृक्ष, स्वतःच्या बंगल्या भोवताली लावलेली फळाफुलांची झाडे, पाणी पिण्यासाठी मिलापनगर तलाव, परिसरातील शांतता इत्यादींमुळे विविध पक्षी येथे येत असतात. त्यात येथील काही हौशी रहिवाशी आपल्या बंगल्याच्या खिडकी, गॅलरी मध्ये त्यांच्या खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत असतात.

मिलापनगर मधील रहिवासी असलेले आर्किटेक्ट विवेक परांजपे यानी आपल्या बंगल्याच्या खिडकीत पक्षांना खाद्य पुरवण्यासाठी बर्ड फिडर ही वस्तू काही दिवसांपूर्वी लावली होती. त्यात ते रोज तांदळाची कणी टाकतात. ते खाण्यासाठी पोपट पक्षांचा झुंडी रोज सकाळी तसेच दिवसभर येत असतात. पोपट बरोबर चिमण्या, खारी हे पण येत असतात. जर एखाद्या दिवशी बर्ड फिडर मध्ये खाद्यपदार्थ टाकण्यास विसरले गेले तर पहाटे पोपट येऊन त्यांचा प्रेमळ आवाजात ओरडून इशारा देत राहतात. साधारण रोज अर्धा ते पाऊण किलो तांदळाची कणी विवेक परांजपे यांचाकडून त्यात टाकली जाते. सदर हे बर्ड फिडर त्यांनी जीवदया या NGO संस्थेकडून घेतले आहे. त्यांनी अनेकजणांना भेट म्हणून बर्ड फिडर दिली आहेत. ज्यांना बर्ड फिडर पाहिजे असेल त्यांनी जीवदया तसेच अँमेझोन इत्यादी साईडवर जाऊन ऑनलाइन मागू शकतात.

आर्किटेक्ट विवेक परांजपे यांचे याबद्दल खास अभिनंदन !  माझ्या घरातील टेरेस गॅलरी समोरील झाडांवर साळुंक्या या पक्षांच्या झुंडी सकाळी येऊन आवाज करीत असतात. त्याचाबरोबर खारी पण येतात. त्यांना लागणारे खाद्य व पाणी टेरेस वरील झाडांच्या कुंड्यांमध्ये ठेवले जाते. त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे सद्याच्या लॉकडाऊन काळात मनाला प्रसन्नता, शांती देऊन जात असल्याचा अनुभव रहिवासी राजू नलावडे यांनी लोकमतजवळ व्यक्त केला

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यcorona virusकोरोना वायरस बातम्या