शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:28 IST

मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.

पालघर : जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यानंतर आता वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममधील २० ते ३० कोंबड्या मागील ५-६ दिवसांपासून मृत्युमुखी पडत असल्याचे समोर आले आहे. या पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या तपासणीसाठी पुणे आणि नंतर तेथून भोपाळ येथील सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील पाषाणे गावातील एका पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्याची बाब उघड झाल्यानंतर, या मृत कोंबड्या तपासणीसाठी भोपाळ येथील सुरक्षा पशुधन संस्थेकडे पाठविण्यात आल्या होत्या. या कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या पोल्ट्री फार्ममधील एक हजार कोंबड्या नष्ट करीत परिसरातील एक किलोमीटर क्षेत्रातील सर्वच कुक्कुटवर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित प्रशासन विभागाला दिले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यानंतर ही बर्ड फ्लूची लाट पालघरमध्ये शिरकाव करते की काय? अशी भीती पोल्ट्री फार्मधारक आणि चिकन विक्रेते दुकानांमध्ये आहे. दरम्यान, मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.

यानंतर त्या मृत कोंबड्यांचे नमुने प्राणी रोग तपासणी विभाग पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ते  आता अधिक तपासासाठी सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळकडे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात याचा अहवाल येण्याचे अपेक्षित असल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. कांबळे यांनी लोकमतला दिली.

कृती आराखडाही तयार - डॉ. कांबळेभोपाळ येथून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास शासनाच्या मानक कार्य पद्धतीनुसार पुढील कार्यवाहीसाठी आम्ही तयार आहोत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरआरपी (रॅपिड रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली असून, आमचा कृती आराखडाही पुढील कारवाईसाठी तयार करण्यात आल्याचे  पशुधन संशोधन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले. भोपाळहून नेमका काय अहवाल येतो याकडे अधिकारी, व्यावसायिक यांचे लक्ष लागले आहे. जर बर्ड फ्लू निष्पन्न झाल्यास परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू