शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:50 IST

काही दिवसांतच दगावल्या ३०० हून अधिक कोंबड्या 

भातसानगर : देशी कोंबड्या व बदके बर्ड फ्लूने मृत पावल्याची घटना तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममध्ये घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्याने येथे खळबळ माजली असून पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिघातील किमान २५ हजारांहून अधिक पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी केले आहे.

शहापूर तालुक्यातील वेहळोली (वासिंद) येथील मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील देशी कोंबड्या व बदके अचानक मृत पावत होते. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कळविले. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार केले. मात्र, उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांच्या शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविले. त्याबाबतच्या अहवालात बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजित हिरवे व डॉ. जी.जी. चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहायक आयुक्त डॉ. अमोल सरोदे, शहापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीत धाव घेतली. मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील सर्वच कोंबड्या दगावल्या असून लगतच्या शेडमधील किमान १०० कोंबड्या व काही बदके सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

एक किमी परिघात कोंबड्या विकण्यास मनाईदरम्यान, बाधित क्षेत्रापासून एक किमीच्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील पक्षी तसेच पक्षी खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली असून बाधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकनविक्रेते, वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याबाबतही ठाणे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू