शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

युवा मतदारांना संदेश देण्यासाठी करिष्मा कपूरसह बिपाशा बसू गुरूवारी ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:49 IST

मतदार दिनाचे औचित्य साधून गडकरीमध्ये गुरु वारी सकाळी ११ ते २ या दरम्यान खास युवा मतदारानासाठी देखील विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्र मास सुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्दे मराठी कलाकारांचीही रेलचेलसुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणारठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी वरिष्ठ अधिकारी

ठाणे : २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. यासाठी ठाणे शहरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या मतदार दिनी युवा मतदारांना मतदान अधिकाराचा संदेश देण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमास गुरूवारी हिंदी चित्रपट अभिनेत्या करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांनी येण्यास सहमती दर्शविली असल्याचे येथील उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.मतदार दिनाचे औचित्य साधून गडकरीमध्ये गुरु वारी सकाळी ११ ते २ या दरम्यान खास युवा मतदारानासाठी देखील विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास सुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखील चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल तसेच इतर मराठी कलाकारांनी उपस्थित राहून युवा मतदारांना संदेश दिला होता. या युवा मतदार दिनाच्या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी वरिष्ठ अधिकारी वर्ग देखील उपस्थिती राहणार आहेत.या कार्यक्र माचा मुख्य उद्देश युवा मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे हा असून ‘मतदार असल्याचा अभिमान - मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य यंदाच्या कार्यक्रमांसाठी जाहीर केले आहे. हा राष्ट्रीय  मतदार दिन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि सर्वच १८ विधानसभा मतदार संघामध्ये साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विविध कार्यक्रमांपैकी अपंग मतदारांचा सत्कार करून त्यांची नाव नोंदणी करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच सहस्त्रक मतदार म्हणजे १ जानेवारी २००० रोजी जन्म झालेल्या नवीन तरु ण मतदारांचा सहस्त्रक मतदार म्हणून ठिकठिकाणी सत्कार होणार आहे. तर सैन्यदलातील मतदारांना यावेळी सहभागी करण्यात येणार आहेत. निवडणूक साक्षरता क्लब - भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार या जिल्हयामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांना देखील विविध कार्यक्रमांमध्ये सहाभागी करण्यात येणार आहेत.

टॅग्स :thaneठाणे