शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:00 IST

कामचुकारांना शिस्त लावण्यासाठी बसविणार फेसरिडिंग मशिन

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही बदल त्यांनी सुचविले आहेत. त्याची कामेही सुरू झालेली आहेत; परंतु काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या उपायुक्तांनी याच रुग्णालयाला अचानक भेट दिली असता, काही गंभीर बाबी त्यांच्या निर्दशनास आल्या आहेत. त्यामुळे आता येथील कर्मचाऱ्यांना, तसेच इतर स्टाफसह डॉक्टरांनाही शिस्त लावण्यासाठी याठिकाणी आता बायोमेट्रिक हजेरी मशीन लावली जाणार आहे. ज्यात फेसरीडींगचा समावेश असणार आहे.महापालिकेत नव्याने आलेले उपायुक्त उमेश बिरारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच कळवा रुग्णालयात अचानक भेट दिली असता, काही विभागातील कर्मचारी हे कामाच्या वेळेसही कामावर हजर नसल्याचे दिसून आले. काही वॉर्डबॉय व इतर स्टाफही जागेवर नसल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम ऐन गर्दीच्या वेळेस ओपीडीवरदेखील झाल्याचे दिसले. त्यातही काही कर्मचारी सुटीवर होते. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

कामाच्या वेळेस गैरहजर असल्याने निर्णयमहापालिका मुख्यालयात ज्या पद्धतीने फेसरीडींग बायोमेट्रिक हजेरी मशीन बसविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता कळवा रुग्णलायतही ही मशीन बसविली जाणार आहे. कळवा रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदींसह इतर ४०० च्या घरात स्टाफ आहे. 

टॅग्स :thaneठाणे