शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी

By admin | Updated: June 25, 2017 04:00 IST

ठाणे महापालिकेमार्फत तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळापासून आजपर्यंत म्हणजेच २० वर्षे शहरात विविध रस्ते व फुटपाथ तयार केले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेमार्फत तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळापासून आजपर्यंत म्हणजेच २० वर्षे शहरात विविध रस्ते व फुटपाथ तयार केले. परंतु, हे रस्ते आणि फुटपाथ विकसित करीत असताना पालिकेकडे कोणत्याही प्रकारचे निकष अथवा नियमच नसल्याची माहिती ठाण्यातील दक्ष नागरिकाला माहिती अधिकारात मिळाली आहे. त्यामुळे २० वर्षे पालिकेने या कामांवर नियमबाह्यरित्या कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.महापालिकेचा मंजूर विकास आराखड्याला आता २० वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता नव्याने तो करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यानुसार रस्ते, फुटपाथ, मिसिंग लिंक आधीच विकसित करण्याचे प्रयोजन करण्यात येत आहे. चालण्यासाठी फुटपाथ मिळावेत, वाहनांसाठी चांगले रस्ते असावेत या उद्देशाने पालिकेन २० वर्षात अशा प्रकारे रस्ते व फुटपाथवर कोट्यवधींचा खर्च केला आहे.रस्ते, फुटपाथ विकसित करताना ते कसे असावेत, तेथे कोणत्या सोई सुविधा असाव्यात, अंध अंपगांसाठी कशी सुविधा उपलब्ध करुन देता येऊ शकते असे काही महत्त्वाचे निकष अथवा नियम असणे अपेक्षित होते. परंतु, या नियम किंवा निकषानुसार कामेच झाली नसल्याची माहिती दक्ष नागरिक प्रदीप इंदूलकर यांना माहिती अधिकारात पालिकेनेच दिली आहे. विकास आराखड्याव्यतिरिक्त जे काही रस्ते अथवा फुटपाथ तयार केले आहेत, त्यासाठी कोणत्याचे प्रकारचे निकष अथवा नियम केलेले नाहीत, केवळ आवश्यकतेनुसार ही कामे केल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची नियमांची अथवा निकषांची प्रतच उपलब्ध नसल्याचेही पालिकेने सांगितले आहे.